शेकडो रुग्णांची निःशुल्क रोगनिदान तपासणी व नेत्र जॉच चष्मे वाटप
गोंदिया, दि. 08 ऑगस्ट : माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामपंचायत परिसर, आसोली येथे आज दि. 08 ऑगस्ट रोजी मित्र परिवाराच्या वतीने निशुल्क रोग निदान, नेत्र तपासणी, निशुल्क चष्मा वाटप व औषध वितरण तसेच आयुष्यमान भारत कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमा मध्ये माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला व उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्ता व नागरिकांनी श्री जैन यांना शुभेच्छा दिल्या.
शिबिरात डॉ संदीप मेश्राम, डॉ.हरीश बजाज, डॉ. मनीष सोनी, डॉ.कुमुद मेश्राम, डॉ ओम बघेले, डॉ स्विटी बघेले, डॉ मोहित गजभिये चमूच्या वतीने शेकडो रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली व नंतर औषध वितरण करण्यात आले. तसेच शेकडो नागरिकांच्या डोळ्याची तपासणी (नेत्र जॉच) करून निःशुल्क चष्मे वाटप करण्यात आले. आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या रुग्णांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध होण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळावा म्हणून शिबिरामध्ये अनेक लाभार्थ्यांचे आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले.
यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, बिरजूलाताई भेलावे, चुन्नीलाल शहारे, सयाराम भेलावे, रामू चुटे, धम्मानंद गणवीर, चैनलाल दमाहे, भागवत फरकुंडे, पुरण उके, सुनील मांडवे, देवेंद्र अंबुले, आशिष गजभिये, अशोक गायधने, योगराज गौतम, मधुकर शिवणकर, मुकेश बाबरे, गणेश शेंडे, सह दया हॉस्पिटल कर्मचारी मोठ्या संख्येने कार्यकर्ता व नागरिक उपस्थित होते.
