फुलचूर येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त विभिन्न कार्यक्रम. 

रोग निदान व रक्तदान शिबिर, महिला मेळावा – बचत गट, शेतकरी मेळावा, कृषी प्रदर्शनीचे आयोजन.

गोंदिया, दि. 08 ऑगस्ट : आनंदी देवी गोपीलाल अग्रवाल इंग्लिश प्रायमरी शाळेचे परिसर, फुलचूर येथे माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात जनतेचे आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी आरोग्य शिबीर, महिला सक्षमी करणाकरिता महिला मेळावा व बचत गटांच्या माध्यमातून उत्पादित मालाचे स्टाल, शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शेतकरी मेळावा व कृषिप्रदर्शनी तसेच नवयुवक व जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, अपंगांना साहित्य वितरण व लघु उद्योगाला मार्गदर्शन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

माजी आमदार श्री राजेंद्र जैन यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना वाढदिवसाच्या व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा उपस्थित कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी दिल्या. उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल प्रशस्ती पत्रक देण्यात आले. आरोग्य तपासणी करून औषध वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. आरोग्य शिबिराला डॉ. पुष्पराज गिरी, डॉ. वज्रा पुष्पराज गिरी, डॉ चंद्रशेखर राणा, डॉ निखिल गजभिये, डॉ किशन टकरानी, डॉ विवेक हरिणखेडे, डॉ रंजित खरोले, डॉ निकिता डी कनोजे, डॉ आनंद कटरे, डॉ रिषभ विश्वास, डॉ धर्मेंद्र टेभऱे, डॉ कुणाल बोपचे, डॉ रितेश कटरे, डॉ दीपक हरिणखेडे, डॉ कार्तिक हिंदुजा, डॉ आस्था ठाकूर, डॉ निहाल गौधुले, डॉ विनय अंबुले सहित अन्य डॉक्टर चमूने सहकार्य लाभले.

या कार्यक्रमात प्रामुख्याने सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, प्रेमकुमार रहांगडाले, केवल बघेले, सिताराम अग्रवाल, प्रकाश कोठारी, वेदप्रकाश गोयल, राजलक्ष्मी तुरकर, मिलन रामटेककर, मुकेश पाटील, पंकज अग्रवाल, घनेश्वर तिराले, लालचंद चौहान, खुशाल वैद्य, सुनील कापसे, महेंद्र चौधरी, भूपेश गौतम, विजय पटले, राजकुमार बघेले, महेश अंबुले, एफ सी पटले, कुंतन पटले, ललिता ताराम, शिवदास कापगते, योगेश डोये, कमलेश कटरे, रंगलाल कटरे, कैलाश नागपुरे, रविकांत लांजेवार, किरणभाऊ बन्सोड, शुभम गौतम, कृष्णकमल बघेले, गणेश बघेले, अनिता तुरकर, सुनीता बोधानी, किरण ठाकरे, दुर्गाताई रेहेकवार, विजय कावळे, मायाबाई ठाकरे, आशाताई हरडे, जणुकाताई कोठवार, सपना उके, देवका खोब्रागडे, रमेश रहांगडाले, केवळ रहांगडाले, हौसलाल रहांगडाले, मुनिलाल मौजे, डोमेश्वर तुरकर, अनिल मोहबे, इंद्रकला कटरे, उर्मिला तुरकर,ओमेश्वरी तुरकर, सरस्वता मौजे, सुनीता मारगाये, रेखा मारगाये, बबिता परसगाये, सुनीता परसगाये, छानु परसगाये, सेमला बघेले, जिरानबाई भंडारी सहित बहुसंख्येने प्रमुख मान्यवर व पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ता व ग्रामवासी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें