दानेश भाऊ साखरे त्या अपघात ग्रस्त इसमासाठी ठरले देवदूत !

अर्जुनी मोर, दि. 08 ऑगस्ट 2024 : अर्जुनी मोरगाव नगर पंचायतीचे नगर सेवर आणि युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दानेश भाऊ साखरे यांनी एका अपघात ग्रस्त नागरिकांची मदत केली असून त्यांना आपल्या कार मध्ये बसऊन उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले, त्या मुळे त्या अपघात ग्रस्त नागरिकाने त्यांचे आभार मानले आहे.

अज्ञात वाहनाच्या धडकेत सायकल सवार जख्मी झाला असून त्याची सायकल संपुर्ण मोडलेल्या अवस्थेत होती. ही घटना आज दि. 08 ऑगस्ट रोजी दुपारी 11 वाजता दरम्यान घडली, आज माजी आमदार राजेंद्र जैन यांचे वाढदिवस निमित्ताने गोंदिया येथील एन. एम. डी. कॉलेज येथे दरवर्षीप्रमाणे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सदर कार्यक्रमाला अर्जुनी मोरगाव वरून गोंदिया कडे जात असताना राज्यमार्ग क्रमांक : 753 ग्राम डव्वा येथे एका अज्ञात वाहनाने ( ट्रकनी ) धडक दिल्यामुळे वृंदावन टोला येथील रहिवाशी हिरालाल भोयर हे जख्मी झाले होते.

घटनास्थळी जख्मीची मदत न करता काही नागरिक बघ्याची भूमिका करत होते. दरम्यान जखमी इसम दिसताच दाणेश भाऊ साखरे यांनी माणुसकीचे दर्शन घडवत आपली गाडी थांबवून जमवाकडून घटनेची माहिती घेत लागलीच जख्मी इसमाला आपल्या गाडीने जवळील रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केले, दानेश भाऊ यांनी अपघातग्रस्त लोकांची मदत करण्यासाठी सर्वांनी वेळेवर मदत करावी असे आव्हान केले आहे. अपघात झाल्यावर जख्मिला वेळीच उपचार नाही मिळाल्यास जीव देखील जाऊ शकते त्या मुळे दानेश भाऊ साखरे त्या अपघात ग्रस्त इसमासाठी  देवदूत ठरले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही. 

Leave a Comment

और पढ़ें