गोंदिया विधानसभेची जागा ही भारतीय जनता पार्टीकडेच राहणार परिणय फुके यांची मोठी घोषणा

गोंदिया, दि. 05 ऑगस्ट : महायुतीकडून विधानसभा निवडणुकीच्या जागा अद्याप घोषित झाल्या नाही. मात्र नवनिर्वाचित विधान परिषदेचे सदस्य डॉ. परिणय फुके यांनी गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागा ही भाजपाला मिळेल अशी घोषणा केली आहे. एकंदरीत गोंदिया विधानसभा क्षेत्रात महायुतीकडून शिवसेना शिंदे गट, अजित पवार राष्ट्रवादी, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी मैदानामध्ये आहे, सध्या जागेची कुठलीही चर्चा न झाल्याचे खासदार प्रफुल पटेल यांनी काही दिवसा अगोदर सांगितले मात्र, गोंदिया विधानसभा क्षेत्राची जागा ही भाजपाकडे होती.

आणि यंदाही भाजप ही जागा लढणार ही मोठी घोषणा विधान परिषदेचे सदस्य डॉ.परिणय फुके यांनी केली आहे. निश्चितच या विधानामुळे अजित पवार गटातील प्रफुल पटेल हे सुद्धा या जागेसाठी इच्छुक असल्याचे दिसून आले मात्र त्यांनी अद्याप या जागे बद्दल कुठलीही घोषणा केली नाही, मात्र भारतीय जनता पार्टी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गोंदिया भंडारा लोकसभा क्षेत्रातील जास्तीत जास्त जागेवर यंदा भाजपा लढण्यास इच्छुक असल्याचे डॉक्टर परिणय फुके म्हणाले. त्या मुळे सीट वाटप वरून महायुती सरकार मध्ये वाद निर्माण तर होणार नाही ना अशी चर्चा आता रंगु लागली आहे. 

Leave a Comment

और पढ़ें