माजी आमदार दिलीप बनसोड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा, सरपंच हर्ष मोदी यांचे निवेदन

सडक अर्जुनी, 05 ऑगस्ट : माजी आमदार तथा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी सौंदड येथील सरपंच हर्ष मोदी यांनी 04 ऑगस्ट रोजी दिलेल्या लेखी निवेदनातून केली आहे. ग्राम पंचायत सौंदड ता. सड़क अर्जुनी जि. गोंदिया येथे दिनांक 03 ऑगस्ट  रोजी बस स्थानक चौकात झालेल्या कॉंग्रेस पक्षाच्या मोर्चात भाषण दरम्यान त्यांच्या मागण्या मांडण्यात आल्या होत्या, यामध्ये कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तसेच माजी आमदार दिलीप बंसोड यांनी त्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 15 आँगस्ट रोजी ग्राम पंचायत सौंदड कार्यालयात होणाऱ्या राष्ट्रीय ध्वजारोहण कार्यक्रम होवू देणार नाही असे भाष्य केल्याचे निवेदनात म्हटले आहे. 

त्यांच्या मागण्या हे केंद्र शासन, महाराष्ट्र शासन संबंधी असून त्याचे ग्राम पंचायत सौंदड सोबत काहीही संबंध नाही. राष्ट्रीय महामार्ग संबंधी सर्विस रस्ता आणि पुलाच्या बांधकाम बाबत या आधी ग्राम पंचायतच्या वतीने मागणी अर्ज सूद्धा सादर केले गेले आहे. करिता स्वातंत्र्य दिनानिमित्त होणा्या ध्वजारोहण कार्यक्रमात कोणतेही विध्न येवू नये यासाठी सदर कार्यक्रमानिमित्त पोलीस संरक्षण पुरविण्यात यावे व कांग्रेस जिलाध्यक्ष दिलीप बंसोड यांच्या वक्तव्य वरून त्यांच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी असी माँगणी सौंदड़ चे सरपंच आणि भाजप युवा मोर्चा चे जिला महामंत्री हर्ष विनोदकुमार मोदी यांनी देशाच्या गृहमंत्री अमित शाह, भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुले, माजी मंत्री डॉ.परिणय फुके, राजकुमार बडोले, माजी खासदार सुनील मेंढे, जिलाधिकारी गोंदिया, पुलिस अधीक्षक गोंदिया यांनी केली आहे।

Leave a Comment

और पढ़ें