अजय लांजेवार यांच्या संकल्पनेतून सौंदड येथे पहिल्यांदा मार्गाच्या दुरूस्ती करीता काँग्रेस चे आंदोलन !

  • मुबंई – हावडा राष्ट्रीय महामार्गावरील खड्यांच्या दुरुस्तीसाठी काँग्रेसचे महामार्गावर रेल्वे रोको आंदोलन!
  • खा. प्रशांत पडोळे यांनी NHAI च्या अधिकाऱ्याला जमिनीत गाडण्याची दिली फोन वरून धमकी. 

गोंदिया, दि. 04 ऑगस्ट : गोंदिया जिल्हयाच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणाऱ्या मुबंई हावडा राष्ट्रीय महामार्ग हा ग्राम सौन्दड येथून जाते, या रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून या राष्ट्रीय मार्गावरून जाणाऱ्या रेल्वे लाईन वर मागील पाच वर्षा पासून उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. हे काम सध्या बंद असल्याने तसेच मुख्य सर्विस मार्गाची दयनीय अवस्था झाल्याने हजारो वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.

तर अनेक वेळा वाहतुकीची देखील कोंडी होते. अनेक वाहने या ठिकाणी अपघात ग्रस्त झाले आहेत, ही बाब लक्ष्यात घेता डॉक्टर अजय लांजेवार यांनी शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचे ठरविले दि. 03 ऑगस्ट रोजी काँग्रेस कमिटीच्या वतीने आज ‘जागो सरकार जागो’ हा आंदोलन करण्यात आला.

या आंदोलनात पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, भंडारा -गोंदिया जिल्ह्याचे खासदार प्रशांत पडोळे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी काँग्रेस चे खासदार प्रशांत पडोळे यांनी NAHI चे अधिकारी सिन्हा यांना फोनवरून चांगलेच खडसावले, खाड्यात एखादयाचा बडी गेला तर तुम्हाला याच खडयात गाडू अशी धमकी खासदार प्रशांत पडोळे यांनी NHAI च्या अधिकाऱ्यांनी दिली,

तर स्वतःखा पडोळे यांनी शेकडो कार्यकर्त्यांना सोबत घेत रेल्वे रुडावर बसत आंदोलन केला तर काही कार्यकर्त्यांनी खड्यात धान पिकांची लागवड केली तर काही लोकांनी खड्यात मासोळ्या पकडत NHAI च्या अधिकाऱ्यांचा निषेध करत आंदोलन केला, तर येत्या तीन चार दिवसात राष्ट्रीय महामार्गवरील आणि सौन्दड गांवात तयार करण्यात येणाऱ्या पुलाच्या पर्यायी रस्त्यावरील खड्डे बुजवून देऊ असे लेखी आश्वासन NHAI च्या अधिकाऱ्यानी खा. पडोळे आणि आमदार अभिजित वंजारी यांना दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी तसेच खासदार प्रशांत पडोळे, आमदार अभिजीत वंजारी, जिल्हाध्यक्ष दिलीप बनसोड, जिल्हा अध्यक्ष निकेश मिश्रा, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष परिवहन विभाग चे नीलम हलमारे, डॉक्टर अजय लांजेवार, शामकान नेवारे लताताई गहाणे सरपंच, पुष्पा खोटेले, तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोडे, दामोदर नेवारे, रीता लांजेवार सह तालुक्यातील व जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होते.

राजदीप कंपनी ला केले ब्लॅकलिस्टेड – NHAl अधिकारी 

सौंदड येथे सुरू असलेले उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक महिन्यापासून बंद आहे, सदर काम हे राजदीप बिल्ड्कॉम या नावाची कंपनी करीत होती, या कंपनीला ब्लॅकलिस्केटेड केले असल्याची माहिती इन.एच.ए.आय चे अधिकारी पत्रकारांशी बोलताना सांगत होते, तसेच सदर कामाची निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत होते, अधिकाऱ्यांना आमदार महोदय तसेच खासदार महोदयांनी चांगलेच धारेवर धरले असून काम लवकरात लवकर झाले नाही तर पुन्हा आंदोलन करू असा इशारा दिला आहे. डॉक्टर अजय लांजेवार यांच्या संकल्पनेतून उड्डाण पुलाच्या व सर्विस रोडच्या दुरुस्तीकरिता काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेले आंदोलन उत्साहात संपन्न झाले असून या ठिकाणी पहिल्यांदाच काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांची देखील आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. 

 

 

Leave a Comment

और पढ़ें