- प्रोत्साहन भत्ता काढून दिल्याच्या मोबदल्यात आरोपीने मागितली 3 हजार रुपयाची लाच!
गोंदिया, दि. 2 ऑगस्ट : आरोपी लोकसेवक सुरेश रामकिशोर शरणागत वय 36 वर्ष, लेखापाल (कंत्राटी), तालुका नियंत्रण पथक, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय गोरेगाव. रा. चोपा ता. गोरेगाव यांनी 3 हजार रुपयाची लाच मागणी केली असून, तडजोडी अंति 2 हजार 500 रुपये तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, तालुका नियंत्रण पथक, गोरेगाव येथे पंचासमक्ष लाच स्वीकारली, त्या आधारावर लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ( एसीबी ) यांनी कारवाई केली आहे.
तक्रारदार या प्राथमिक आरोग्य केंद्र चोपा अंतर्गत उपकेंद्र गिधाडी ता. गोरेगाव येथे कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे. आरोपी हे तालुका नियंत्रण पथक गोरेगाव येथे कंत्राटी लेखापाल म्हणून कार्यरत आहे. तक्रारदार यांचे 16 हजार 500 रुपये रकमेचा ईंसेंटीव्ह ( प्रोत्साहन भत्ता) काढून दिल्याच्या मोबदल्यात आरोपी यांनी 3 हजार रुपयाची लाच मागणी केली असल्याबाबत तक्रार जिल्हा लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांना प्राप्त झाली.
लाच मागणी पडताळणी दरम्यान पंचासमक्ष आरोपीने 3 हजार रुपयाची लाच मागणी करुन तडजोडी अंती आरोपी याने पंचासमक्ष 2500 रुपये लाच रक्कम स्वीकारली असता आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून पोलीस स्टेशन गोरेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सापळा कार्यवाही पो.नी. अतुल तवाड़े, पो.नि. उमाकांत उगले. स.फौ. करपे, पो.हवा. संजयकुमार बोहरे, मंगेश काहालकर, नापोशि. संतोष शेंडे, संतोष बोपचे, कैलास काटकर अशोक कापसे, प्रशांत सोनवाने, मनापोशी संगीता पटले , रोहिणी डांगे, चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांच्या पथकाने केली आहे.