अर्जुनी मोरगाव, दि. 2 ऑगस्ट : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ग्राम खामखुरा येथील माधवराव नेवारे यांच्या घरी घरघुती गॅस सिलेंडर चे स्फोट झाल्याने मोठे नुकशान झाले, तसेच आलेल्या पावसामुळे त्यांच्या घराची भिंत कोसळली, घरातील जीवन उपयोगी साहित्य संपूर्ण पावसाने भिजल्यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.
नेवारे कुटुंबाची दानेशभाऊ साखरे ( नगरसेवक न.पं. अर्जुनी/मोर. तथा उपाध्यक्ष, युवक राष्ट्रवादी काँग्रेस गोंदिया जिल्हा) यांनी भेट घेऊन सांत्वना दिली व कुटुंबाला योग्य मदत प्रशासना कडून मिळावी या साठी तहसीलदार यांच्याशी चर्चा केली. नेवारे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तू भेट केली. या वेळी निप्पल बरैया उपसरपंच खामखुरा, संजय राऊत, प्रकाश नेवारे, विदेश मेश्राम, लाडे भाऊ, शालिकराम हातझाडे, आर. के. जांभुळकर, प्राचार्य पटले, राजू लाडे इत्यादी कार्यकर्ते व समस्त गावकरी उपस्थित होते.