सडक अर्जुनी, दि. २ ऑगस्ट : सौंदड येथिल लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने येथे आज दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोज गुरुवारला विद्यालयात बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी, जमुनादेवी लोहिया पुण्यतिथी तसेच अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. न. घाटबांधे, उपाध्यक्ष लो. शि. संस्था, प्रमुख अतिथी संस्थापक संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया, प्राचार्य उमा बाच्छल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक एम. के. शिंदे, पर्यवेक्षक डी.एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर.एन. अग्रवाल यांनी प्रतिमेच्या स्वरूपात उपस्थित असलेल्या माता सरस्वती, लोकमान्य बाल गंगाधर टिळक आणि जमुनादेवी लोहिया यांच्या प्रतिमेचे पूजन केले.
दोन मिनिटांचे मौन पाळून या थोर आत्म्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांनी ” आईची शिकवण व प्रेरणा यातूनच आम्हा सर्व भावंडाना जीवनात विविध क्षेत्रात यश मिळवता आले व समाजसेवेत योगदान देता आले.” तसेच विद्यार्थ्यांनो या विद्यालयातून संस्कार युक्त शिक्षण घेवून विविध क्षेत्रात उत्तुंग यश मिळवा पण आपल्या आई – वडील व वडीलधाऱ्यांना विसरू नका” असे मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आ.न. घाटबांधे, उपाध्यक्ष, लो. शि. संस्था, प्राचार्य उमा बाच्छल, प्राचार्य गुलाबचंद चीखलोंढे मुख्याध्यापक मनोज शिंदे, सहा. शिक्षिका नीलिमा अलोने यांनी आपल्या भाषणातून जमुनादेवी लोहिया, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी आपल्या भाषनातून सविस्तर मार्गदर्शन केले. वर्ग ११ विज्ञानची विद्यार्थीनी कु. वैभवी गहाने हिने आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. यु. बी. डोये यांनी केले तर आभार आणि सहाय्यक शिक्षक टी.बी. सातकर यांनी मानले.
