सौंदड, दि. 31 जुलै : येथील लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्वरदास जमनादास लोहिया माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सौंदड येथील कार्यरत श्री. आर.डी. राऊत, परिचर तसेच श्री. पी. एम. कटकवार, नाईक हे नियत वयोमानानुसार दी ३१ जुलै रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचा लोहिया शिक्षण संस्था व विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला, दोन्ही कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभाचा कार्यक्रम जगदीश लोहिया संस्थापक -संस्थाध्यक्ष लो. शि. संस्था यांच्या अध्यक्षतेखाली आ. न. घाटबांधे, उपाध्यक्ष लो. शि. संख्या, मा. पंकज लोहिया, सचिव लो. शि. संस्था, अनिल मेश्राम, से. नि. मुख्याध्यापक, भजनदास बडोले, पुरुषोत्तम लांजेवार, महादेव लाडे, अनिल दीक्षित, नलीराम चांदेवार, रामचंद्र भेंडारकर प्राचार्या उमा बाच्छल, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक, एम. के. शिंदे, पर्यवेक्षक, डी. एस. टेंभुर्णे, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, संस्थापक संस्थाध्यक्ष लो. शि. संस्था तसेच प्रमुख अतिथी यांनी सेवानिवृत्त कर्मचारी आर. डी. राऊत व पी. एम. कटकवार यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेटवस्तु देउन त्यांचा सत्कार केला, यावेळी त्यांचे कुटुंबीय सदस्य उपास्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष जगदीश लोहिया, यांनी सेवानिवृत्त कर्मचारी आर. डी. राऊत व पी. एम. कटकवार यांच्या सेवाकाळातील कामाची खूप प्रशंसा केली, विद्यालयाचे प्राचार्य तसेच शिक्षाकांनी दोन्ही कर्मचाऱ्याच्या त्यांच्या सेवाकाळातील कामाचे व सहकार्य वृत्तीची प्रशंसा केली. तसेच सर्वांनी त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या, यावेळी संस्था शाळा समिती शाळा सुधार समिती यांचे पदाधिकारी व सदस्यगण तसेच विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कु. यु. बी. डोये यांनी केले तर आभार सहाय्यक शिक्षक टी. बी. सातकर यांनी मानले.