“आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर” : आ. मनोहर चंद्रिकापुरे यांनी पत्नीच्या वाढदिवस कार्यक्रमात गायल मधुर गाणे.

  • “तेरे मस्त मस्त दो नयन मेरे दिल का ले गये चैन” 68 वर्षीय मंजुषाताई चंद्रिकापुरे यांचा वाढदिवस थाटात संपन्न.

गोंदिया, दि. 31 जुलै : जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या पत्नी सौ. मंजुषाताई चंद्रिकापुरे यांचे 68 वे जन्मदिनाचे कार्यक्रम सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहमारा येथील आमदार कार्यालयाच्या प्रांगणात आज दि. 31 जुलै रोजी दुपारी आयोजित करण्यात आले होते, दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते, उपस्थित पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी पत्नीचे वाढदिवस निमित्ताने अनेक सु – मधुर गीत गाऊन स्व: पत्नीला खुश करण्याचं प्रयत्न केले, “आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर” आणि “तेरे मस्त मस्त दो नयन मेरे दिल का ले गये चैन” या गीता सह अनेक गीत त्यांनी दरम्यान गायल त्यामुळे मंजुषा ताई चंद्रिकापुरे या आनंदाने भारावून गेल्या होत्या ( आनंदी ) झाल्या होत्या, त्याचबरोबर उपस्थित कार्यकर्ते देखील खुश झाले, दरम्यान केक कापून पुढील कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

अनेक उपस्थित पाहुणे मंडळींनी पुष्पगुच्छ देऊन मंजुषा ताई चंद्रिकापुरे यांना जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या, यावेळी अनेक शासकीय अधिकाऱ्यांनी देखील हजेरी लावली होती, आमदार मनोहर चंद्रिकापुरे सह त्यांचे मोठे सुपुत्र सुगत चंद्रिकापुरे आणि लहान मुलगा विराट चंद्रिकापुरे यांच्या उपस्थित केक कापण्यात आला, त्याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सडक अर्जुनी येथील तालुका अध्यक्ष अविनाश काशीवार, अर्जुनी मोरगाव तालुक्याचे अध्यक्ष लोकपाल गाहाने, गोरेगाव तालुका अध्यक्ष केवल बघेले, महिला तालुका अध्यक्ष रजनी गिऱ्हेपुंजे, गोरेगाव येथील महिला तालुका अध्यक्ष बहेकार ताई, निशा मस्के महिला गट प्रमुख, माधुरी पिंपलकर मोरगाव अर्जुनी महिला नगर अध्यक्ष, तेजराम मडावी नगर अध्यक्ष नगर पंचायत सडक अर्जुनी, उपाध्यक्ष वंदना डोंगरवार, दीक्षा भगत सभापती, शशिकला टेंभुर्ने माजी नगर अध्यक्ष, साहिस्ता शेख नगरसेवक, दाणेश साखरे नगरसेवक अर्जुनी मोर, मंजुषा बारसागडे नगराध्यक्ष अर्जुनी मोर नगरपंचायत, आनंद अग्रवाल, दिशा शाहारे, आम्रपाली डोंगरावर, पुष्पालता दुर्गकर, शिवाजी गहाणे प.स. सदस्य, पुष्पा बडोले, वनिता कोरे, करुणा गेडाम, रतिराम राणे, संजय ईश्वर, राजेंद्र जांभूळकर, शुभांगी वाडवे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

 

Leave a Comment

और पढ़ें