तिरोडा, दि. 30 जुलै : विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बंधूना स्वावलंबणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी आणि दैनदिन जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी तिरोडा गोरेगाव विधासभा क्षेत्राचे आमदार विजय रहांगडाले डिसेम्बर २०२३ मध्ये स्व.अटलबिहारी यांच्या जयंतीनिमित्त विधानसभा क्षेत्रातील दिव्यांग बंधूकरिता तपासणी शिबीर आयोजित केला होते. त्या शिबिरामध्ये नागपूर येथील तज्ञ डॉव-टरांकडून तपासणी केली होती, त्यामध्ये एकूण २९ लाभार्थ्याची निवड करण्यात आली होती, त्यांना आज २९ जुलै रोजी आमदार महोदयांच्या हस्ते ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले आहे.
यामध्ये प्रामुख्याने जितेंद्र रहांगडाले कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती, कुंताताई पटले सभापती पंचायत समिती तिरोडा, उपराज जमाईवार उपसभापती पंचायत समिती तिरोडा, ओम कटरे अध्यक्ष जिल्हा युवा मोर्चा भाजपा, भाऊरावजी कठाने तालुका अध्यक्ष भाजपा, स्वानंद पारधी अध्यक्ष तिरोडा शहर भाजपा, चतुर्भुज बिसेन जिल्हा परिषद सदस्य, पवन पटले जिल्हा परिषद सदस्य, माधुरी रहांगडाले जिल्हा परिषद सदस्य, तुमेश्वरीताई बघेले जिल्हा परिषद सदस्य, रजनीताई कुंभारे जिल्हा परिषद सदस्य कविताताई सोनेवाणे पंचायत समिती सदस्य तिरोडा, प्रमिलाताई भलाई पंचायत समिती सदस्य तिरोडा, ज्योतीताई टेंभेकर पंचायत समिती सदस्य तिरोडा, सुनंदाताई पटले पंचायत समिती सदस्य तिरोडा, तेजराम चव्हाण पंचायत समिती सदस्य तिरोडा, डॉ. बी. एस. रहांगडाले माजी पंचायत समिती सदस्य, सोनालीताई देशपांडे माजी नगराध्यक्ष नगरपरिषद तिरोडा, संजय बैस माझी नगरसेवक तिरोडा, मिलिंद कुंभरे संचालक कृषी बाजार समिती तिरोडा, भूषण झरारिया संचालक कृषी बाजार समिती तिरोडा, मनोहर बुद्धे, अनुप बोपचे, दिगंबर ढोक, प्रकाश सोनकावडे, सारंग मानकर, सोनालीताई सोनकावडे, मीनाक्षीताई ठाकरे, रेखाताई चौधरी, दिनेश पटले जिल्हा उपाध्यक्ष अपंग संघटना गोंदिया, राजू बरीयेकर जिल्हा सचिव अपंग संघटना गोंदिया व लाभार्थी उपस्थित होते.