शिवधाम पिंडकेपार येथे रुद्राभिषेक कार्यक्रम संपन्न.

गोंदिया, दि. 30 जुलै : श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वावर पिंडकेपार शिवधाम, गोंदिया येथे पार्थिव शिवलिंग भगवान महादेवाला रुद्राभिषेक कार्यक्रमाचे आयोजन दि. 29 जुलै रोजी महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आले. प्रमुख अतिथी माजी आमदार राजेंद्र जैन, डॉ. हर्षा कानतोडे, डॉ. रिचा कोंडवानी, डॉ. प्राची अग्रवाल, शहर अध्यक्ष नानू मुदलियार यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. भगवान महादेवाला रुद्राभिषेक करतांना श्री जैन यांनी सर्वांच्या दुःखाचे निवारण व सुख समृद्धीची मनोकामना केली. यावेळी शिव धाम परिसरात माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.   

याप्रसंगी श्री जैन संवाद साधतांना म्हणाले कि, भगवान शंकराला रुद्राभिषेक केल्याने महादेवाची भक्ती प्राप्त होते. भगवान शिव हे अनंत, अविनाशी आणि महाकाल आहेत. सर्व प्रकारच्या दुःखाचा नास करण्यासाठी आणि जीवनात असाध्य असलेल्या सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होण्यास मदत होते. योग्य हेतूने रुद्राभिषेक केल्याने जिवनात सकारात्मकता आणि सुसंवाद निर्माण होऊन शिव उपासना केल्याने संकट दूर होतात. 

यावेळी रुचिता चौहान, संगीत माटे, माधवी चुटेलकर, निशा नागले, करुणा बघेले, वैशाली पारधी, कला शेंद्रे, प्रगती दीप, तब्बू दीप, कविता इमलाह, शिवानी इमला, विनिता इमलाह, पिंकी दीप, रंजिता सागर, सरोज दीप, जुली दीप, वनिता माटे, मनीषा दीप, कांता दीप, ममता कुमार, मधु कुमार, रीमा कुमार, दामिनी कुशवारे, भूमी कुमार, श्वेता कुमार, भवानी दीप, आराधना माटे, कोमल दीप, बाली रक्षेल, संध्या छडीमलक, राणी श्रीवास, किरन दमाहे, नयना चव्हाण, माधुरी कुमार, बबली दिप, हिना मानकर, गौरी क्षिरसागर, आशा भांडारकर, मीना मानकर, लक्ष्मी मानकर, श्वेता पारधी, अनिता कुमार, बबीता दीप, सरस्वती दीप, सरिता रक्षेल, माया माटे, अश्विनी दावणे, गायत्री असटकर, लक्ष्मी भेंडारकर, नेहा सातोने, योधांशी दीप, मंजू उरकुडे, प्रिया छडिमलक, पिहू कुमार, डाली दिप, नयना बघेले, उषा कोरे, खुशबू बोकडे, निकिता बघेले, जया छडीमलक, प्रतिमा राणे, पायल पात्रे, सुनिता सागर, खुशी कुमार, शारदा चौबे, पुनम भोयर, पुष्पा भोयर, निर्मला डहाके, कविता तिवारी, प्रमिला डाहाके, ममता दुबे, उषा प्रजापती, शितल प्रजापती, सुनंदा कोरोते, गीता निहारे, उर्मिला डोंगरवार, भारती डोंगरवार, दीपिका बिसेन, माया टेंबरे, संगीता माटे, कविता चव्हाण, मालू डोंगरवार, उषा प्रजापती, सीता चक्रवर्ती, उषा प्रजापती, कंचन प्रजापती, कृष्णा प्रजापती, राधा प्रजापती, कौतिक डहाके, दुर्गा डहाके, मोना मिश्रा, कुसुम मिश्रा, निधी मिश्रा, शकुन हरिणखेडे सहित मोठ्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रुचिता चौहान तर आभार संगीत माटे यांनी केले.

Leave a Comment

और पढ़ें