सौंदड – फुटाळा येथे खराब रस्त्यामुळे लाकूड घेऊन जाणारे ट्रक झाले पलटी

  • राष्ट्रीय महामार्ग नागपूर ते रायपूर वरील प्रकार… 

गोंदिया, दि. 30 जुलै : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 हे ग्राम सौंदड ते फुटाळा येथुन जाते, येथे उड्डाण पुलाचे काम गेले सहा वर्षापासून सुरू आहे, हे काम राजदिप बिल्डकॉम प्रायव्हेट लिमिटेड या नावाची कंपनी करत आहे, मात्र सध्या स्थितीत हे काम बंद आहे, पुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्विस मार्गाचे अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.

या ठिकाणी संपूर्ण रस्त्याची चाळण झाली असल्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे, परिणामी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, या मार्गाने दि. 24 जुलै रोजी लाकुड घेऊन जाणारे एक ट्रक खड्ड्यांमुळे पलटी झाले आहे, त्यामुळे बरेच वेळ मार्ग संपूर्ण बंद होते, ट्रक ला उभे करण्यासाठी हायवाचा वापर करण्यात आला, विशेष म्हणजे या ठिकाणी गेली दोन दिवसापासून ट्राफिक देखील जाम आहे, त्यामुळे या मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना तासन तास वाहनामध्ये बसून मार्ग मोकळा होण्याची वाट पहावी लागत आहे. 

या मार्गाने चालणाऱ्या नागरिकांसाठी हे अत्यंत दुर्दैवी मार्ग ठरले आहे, तर याच मार्गावर सावंगी गावाजवळ 28 जुलै च्या रात्री एका अज्ञात स्कुटी चालकाचे ट्रकच्या धडकेत मृत्यू झाल आहे, हे नागपूर ते रायपूर मार्गावरील प्रकार आहे, याच ठिकाणाहून गोंदिया ते चंद्रपूर रेल्वे मार्ग आहे, या मार्गाने नियमित रेल्वे गाड्या धावत असल्याने महामार्ग अनेक वेळ बंद राहते परिणामी या ठिकाणी वाहनांची मोठी कोंडी होते, लांब रांगा लागल्याने चक्का जाम होते, प्रशासनाने या मार्गाची लवकरात लवकर दुरुस्ती करून वाहन चालकांना सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.

या मार्गाच्या दैनिय अवस्थेकडे खासदार साहेब लक्ष देतील का ? 

गोंदिया भंडारा या दोन्ही जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे आहेत, ते या मार्गाच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष देतील का ? असं प्रवाशांकडून बोललं जात आहे, यापूर्वी भंडारा गोंदिया जिल्ह्याचे खासदार सुनील मेंढे होते, त्यावेळी देखील या मार्गाची याच प्रकारे दयनय अवस्था होती, आणि त्यामुळेच कंटाळलेल्या नागरिकांनी प्रवाशांनी झालेल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रशांत पाटोळे यांना निवडून दिले आहे.

काँग्रेस पक्षाचे डॉक्टर प्रशांत पडोळे हे नाना पटोले यांच्या अगदी जवळचे आहेत, यापूर्वी खासदार सुनील मेंढे यांना या मार्गासाठी अनेक राजकीय लोक सोशल मीडिया वरून अनेक प्रकारच्या पोस्ट करत होते, की राज्यात आणि केंद्रामध्ये भाजप सरकारची सत्ता असून देखील या मार्गाची दयनीय अवस्था आहे, मात्र आता काँग्रेसचे खासदार या भागांमध्ये निवडून आल्याने या मार्गाची आणि उड्डाण पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करून मार्ग नागरिकांसाठी सुरळीत करावी अशी मागणी होत आहे.

 

Leave a Comment

और पढ़ें