सडक अर्जुनी, दि. २९ जुलै : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चा ६२ वा वर्धापन दिन आमदार मनोहर चंद्रिकापुरे मोरगांव अर्जुनी क्षेत्र यांच्या हस्ते गोंदिया जिल्हा प्राथमिक सहकारी पतसंस्था सडक अर्जुनी येथे वृक्षारोपण करून वर्धापन दिन साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने सातत्याने ६२ वर्षाच्या इतिहासात शिक्षकांना पेन्शन व विविध वेतन व भत्ते केंद्राप्रमाणे मिळवून देण्यात आग्रही भूमिका उचललेली आहे, मागील अनेक वर्षात शिक्षकांच्या प्रश्नांना घेवून आंदोलनं, मोर्चे, धरणे करून गोंदिया जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांचे अनेक प्रलंबित प्रश्न सोडविले आहेत.
याप्रसंगी आमदार मनोहर चंद्रिकापुरे विधानसभा क्षेत्र यांनी शिक्षक समितीच्या माध्यमातुन राबवित आसलेल्या विविध सामाजिक उपक्रमाची प्रशंसा करून शुभेच्छा दिनाच्या सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी किशोर डोंगरवार विभागीय अध्यक्ष तथा गोंदिया जिल्हा शिक्षक सहकारी पतसंस्था गोंदिया, विनोद बडोले शाखाध्यक्ष, ममता पटले जिल्हाध्यक्ष महिला आघाडी, वीरेंद्र वालोदे, महेश कवरे, जीआर गायकवाड, घनश्याम कापगते, आनंद मेश्राम, जीवन म्हशाखेत्री, रतन गणवीर, सी.बी. गोबाडे, नंदू वैद्य, पि टी. नेवारे, अरविंद कापगते, संदीप खेडीकर, नरेश मेश्राम, राजेश शेंडे, भागवत गुरनुले, मोरेश्वर शिरसागर, सुभाष हरीणखेडे, अरुण वैद्य, हेमंत मडावी, पी.सी. चचाने, रवी मारवाडे, जी.जे मळकाम, मंगेश मेश्राम, जयंत रंगारी, वाय. एच. काशीवार, सोहम कापगते, टी.एस. मानकर, अविनाश राऊत, माणिक बेंदवार, एम. एच. कापगते, साखरे बोपाबोडी, जांभूळकर परसोडी उपस्थित होते.
