लोकसभेच्या निकालावरून खा. प्रफुल पटेल यांनी व्यक्त केली नाराजी, कार्यकर्त्यांना दिला दम! 

  • सडक अर्जुनी येथे राष्ट्रवादी अजित पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न. 
  • 1600 कोटी रुपयांची कामे साडेतीन वर्षांमध्ये केली आहेत : आ. मनोहर चंद्रिकापुरे

गोंदिया, दि. 27 जुलै : लोकसभा निवडणुकीत जी चूक केली ती पुन्हा करू नका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा खासदार निवडून दिल्ली ला पाठविले असते तर माझे हाथ देखील मजबूत झाले असते, तुम्ही माजी काळजी करू नका मी स्वतःची व्यवस्था केली आहे, मात्र मला तुमची व्यवस्था करायची आहे, आगामी विधानसभा निवडणुका येत्या दोन तीन महिन्यात होत आहेत, आपलाच आमदार पुन्हा निवडून येणार आहे, असे सुचक वक्तव्य खा. प्रफुल पटेल यांनी सडक अर्जुनी येथील तेजस्विनी लॉन येथे 26 जुलै रोजी आयोजित कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केले आहे. 

ते पुढे म्हणाले काही कामे असली तर तुम्हाला भाईजी आठवतात आणि निवडणुका आल्या तर दुसरे आठवतात, मला माहित नाही तुम्हाला काय गूढ देवून जातात, म्हणून तुम्ही त्यांना मतदान करून जिल्याचा विकास थांबवता, आम्ही काय विकास कामे केली, करत आहोत, याची आठवण तुम्हाला वारंवार करून द्यावी लागते, हे बरोबर नसल्याचे खा. प्रफुल पटेल म्हणाले आणि त्यांनी कार्यकर्त्यावर संताप व्यक्त करीत पुन्हा पुन्हा अस्या चुका करू नका अस्या सूचना केल्या तर आगामी विधानसभा निवडणुका पाहता ज्या पद्धतीने केंद्रात नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्राधान झाले त्याच पद्धतीने राज्यात महायुतीची सत्ता येणार याला कुणीही रोखू शकत नाही, त्यामुळे तुम्ही अप प्रचाराला बळी पडू नका असे देखील खा. प्रफुल पटेल म्हणाले.

1600 कोटी रुपयांची कामे साडेतीन वर्षांमध्ये केली आहेत : आ. मनोहर चंद्रिकापुरे

सभेद मध्ये मंचावरून बोलताना आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचून दाखवला आहे. त्यांनी सांगितलं की या एकट्या तालुक्यामध्ये 150 कोटी रुपयांची रोड रस्त्याची काम केली आहे, सिंचना संदर्भात कामे केली आहेत, गेल्या दहा वर्षात जी कामे झाली नाही ती एकट्या तालुक्यामध्ये 16 ते 17 ठिकाणी पूल बांधण्याचे काम केले आहे, स्थानिक निधीतून देखील या तालुक्याला भरभरून मदत केली आहे, 72 कोटी रुपयाचा 100 खाटाचा दवाखाना ग्रामीण रुग्णालय आपल्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये आपण उभी करणार आहोत, त्याचबरोबर नव्याने तलाठी कार्यालयाचे निर्माण होणार आहेत. 

अशा अनेक विकास कामांचा पाढा आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना वाचला आहे. हेच नाही तर महिलांसाठी सुरू झालेली माझी लाडकी बहीण योजना, तसेच लाडका भाऊ योजना, यावरही ते बोलले, ते बोलताना पुढे म्हणाले 195 कोटीची कामे सिंचना करिता मंजूर केली आहेत, विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक ग्राम पंचायतला निधी उपलब्ध करून दिला आहे, पाच वर्षांमध्ये मला फक्त साडेतीन वर्ष काम करण्याची संधी मिळाली यामध्ये कोरोनाचा काळ होता, तसेच सत्ता बदल झाले, तरी देखील 1600 शे. कोटी रुपयांची कामे प्रफुल भाई पटेल, आणि अजित दादा यांच्या सहकार्याने अर्जुनी मोर. विधानसभा क्षेत्रामध्ये केली आहेत.

याप्रसंगी प्रफुल पटेल यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सुनील फुंडे, प्रेमकुमार रहांगडाले, अविनाश ब्राह्मणकर, यशवंत गणवीर, अविनाश काशिवार, रजनी गिऱ्हेपुंजे, शिवाजी गहाणे, वंदना डोंगरवार, दीक्षा भगत, शाहिस्ता शेख, शशिकला टेम्भूर्णे, कामिनी कोवे, आंनद अग्रवाल, देवचंद तरोणे, रमेश चुर्हे, प्रभुदयाल लोहिया, बाबुराव कोरे, रूपविलास कुरसिंगे, दाणेश साखरे, तेजराम मडावी, गजानन परशुरामकर, राहुल यावलकर, मंजूताई चंद्रिकापुरे, डॉ सुगत चंद्रिकापुरे, विशाल शेंडे, भृंगराज परशुरामकर यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें