प्रत्येक नुकसान ग्रस्तांच्या नोंदी घेण्याच्या प्रशासनाला सूचना दिल्या : खा. प्रफुल पटेल

गोंदिया, दि. 26 जुलै : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकर्ता बैठक श्रीमती पुष्पाताई मानापुरे यांच्या निवासस्थान समोरील परिसरात, मुंडीपार ता. गोरेगाव येथे खासदार प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत दि. 26 जुलै रोजी संपन्न झाली. यावेळी बोलतांना श्री. पटेल म्हणाले मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई करण्यासंबंधीचे प्रशासनाला निर्देश दिले असून मी पुरपीडितांच्या पाठीशी पूर्ण ताकदीनिशी उभा असून प्रशासनाला तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याचे व प्रत्येक नुकसान ग्रस्तांच्या नोंदी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य जनतेची कामे करावीत मी सदैव आपल्या पाठीशी आहे. आपण सत्तेत विकासासाठी असून महायुती सरकारने शेतकऱ्यांना हेक्टरी २० हजार रुपये बोनस देण्याचे काम केले आहे. युवकांच्या हितासाठी मुद्रा लोन, युवा प्रशिक्षण च्या माध्यमातून रोजगाराच्या संधी, आवास योजना, शेतकऱ्यांना ७.५ एच.पी. पर्यंत कृषी वीज मोफत, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी लाडली बहीण योजना अश्या अनेक जण हितोपयोगी योजनांच्या माध्यमातून सरकार कल्याणकारी योजना अंमलात आणल्या आहेत असे प्रतिपादन प्रफुल पटेल यांनी केले.

याप्रसंगी प्रफुल पटेल यांच्या सोबत माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, प्रेमकुमार रहांगडाले, यशवंत गणवीर, केवल बघेले, सोमेश रहांगडाले, विशाल शेंडे, दाणेश साखरे, कृष्णकुमार बिसेन, कल्पना बहेकार, ललिता पुंडे, महेंद्र बघेले, देवचंद सोनवाने, लालचंद चौहान, सुरेंद्र रहांगडाले, बाबा बहेकार, खुशाल वैद्य, पुष्पाताई मानापुरे, चौकलाल येडे, भूपेश गौतम, डिलेश्वरी तिरेले, हेतराम रहांगडाले, दुलीचंद राऊत, भास्कर मानापुरे, शेषकुमार रहांगडाले, श्याम फाये यांच्या सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें