गोंदिया जिल्यातील सर्वात मोठा इटीयाडोह धरण सलग तिसऱ्यांदा झाला ओव्हरफ्लो

गोंदिया, दि. 25 जुलै : जिल्यातील सर्वात मोठा धरण समजला जाणारा इटीयाडोह धरण सलग तिसऱ्यांदा यावर्षी पहिल्यांदाच ओव्हरफ्लो झाला आहे.

गोंदिया जिल्यात यावर्षी दमदार पावसाने हजेरी लावल्याने इटीयाडोह धरण जुलै महिण्यातच ओव्हरफ्लो झाला आहे तर या आधी 15 आगस्ट 2022 ला आणि मागील वर्षी 21 सप्टेंबर 2023 हा धरण ओव्हरफ्लो झाला होता तर यावर्षी पहिल्यांदा 24 जुलै ला धरण ओव्हरफ्लो झाल्याने गोंदिया भंडारा जिल्यासह गडचिरोली, चंद्रपूर जिल्यातील शेतकऱ्यांची चिंता मिटली आहे.

खरीप पिका शह शेतकऱ्यांना रब्बी पिकासाठी देखील पाणी मिळेल तर विशेष बाब म्हणजे इटीयाडोह धरण फक्त शहा दिवस आलेल्या मुसळधार पाऊसामुळे भरला असून पर्यटक देखील या धरणाचे निसर्ग रम्य दृश्य पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत. 

Leave a Comment

और पढ़ें