सडक अर्जुनी दिनांक 24 जुलै 2024 : सडक अर्जुनी तालुक्यामध्ये तसेच अर्जुनी मोर. तालुक्यामध्ये 19 जुलैपासून सतत धार पावसाने हजेरी लावली असून अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक गावातील नागरिकांच्या घराची पडझड झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची नुकसान झाल्याचे चित्र आहे.
नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अनुसूचित जाती सेल चे सडक अर्जुनी तालुका अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सडक अर्जुनी चे संचालक हरीश कुमार बनसोड यांनी सडक अर्जुनी तालुक्यात तसेच अर्जुनी मोरगाव तालुक्यामध्ये दौरा काढला असून नागरिकांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच नागरिकांच्या समस्या बाबत माहिती प्रांताध्यक्ष नाना पटोले यांना देणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
अर्जुनी मोर. तालुक्यामध्ये तसेच सडक अर्जुनी तालुक्यामध्ये सतत धार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पेरणी झालेले भात पीक पाण्याखाली आले आहे त्यामुळे दुबार पेरणीची वेळ काही शेतकऱ्यांवर येऊ शकते करिता सडक अर्जुनी तालुक्यातील तसेच अर्जुन मोरगाव तालुक्यातील काही भागांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी हरीश बनसोड यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.
ते पुढे म्हणाले आपल्या लोकांची काळजी घेणे, त्यांच्या सुखं दुःखात सहभागी होणे हे प्रत्येक लोकप्रतिनिधी चे कर्तव्य असते, माझ्या मतदार संघातील जनते प्रती मी संवेदन शिल आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता मला आपल्या कुटुंबा सारखे मानते हे माझे भाग्य समजतो, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील कोहलगाव, धाबेपवनी, जांभळी येलोडी, रामपुरी या गावांची भेट घेतली असून यादोराव दुलाराम मेश्राम यांच्या घरी मुसळधार पावसामुळे पाणी शिरले पुराच्या पाण्यामुळे मेश्राम यांच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, त्यांच्याशी संवाद साधत प्रशासनाला याबाबद अवगत केल्याची माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.