अर्जुनी मोर. तालुका ओला दुष्काळ घोषित करा : ललितकुमार बाळबुद्दे यांचे यंत्रणेला निवेदन

अर्जुनी मोर, दि. 25 जुलै : अर्जुनी मोर तालुक्यात अतिवृष्टीमुळे पुरग्रस्त शेतक -यांचे, संपुर्ण धान उत्पादक शेतक-यांचे, विमा काढलेला असो वा नसो पंचनामे करुन तालुकास्तरीय यादी तयार करण्याबाबत दि. 23 जुलै रोजी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था संघ तालुका- अर्जुनी/मोरगांव, अध्यक्ष-ललीतकुमार बाळबुद्धे, उपाध्यक्ष- सुभाष देशमुख आणि सचिव- अरुण गजापुरे यांनी लेखी स्वरूपाचे निवेदन विषय नमूद करून तहसीलदार तथा कृषी अधिकारी यांना दिले आहे. 

त्यांनी लेखी निवेदनात म्हटले आहे की दि.19, 20, 21, 22 जुलै आणि समोर होत असलेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी तसेच इतर पिकाचे नुकसान झाले आहे. प्रत्येक ढोडे, नाले ओसांडुन वाहुन गेले त्या कारणाने काही शेतक-यांचे परे, धान पेरणी बाकी असलेले परे, धान पेरणी केलेले रोवणी वाहुन गेलेल्या स्थितीत आहेत.

तरी शेतक-यांची शेती पळीत राहु नये यासाठी धावपळ सुरु झालेली आहे. संपुर्ण तालुका अतिवृष्टीमुळे पाणी पाणी झालेला आहे. तरी तालुका ओला दुष्काळ म्हणुन घोषीत करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून केली आहे. 

Leave a Comment

और पढ़ें