सौंदड – फुटाळा येथील महामार्गाची पुन्हा झाली चाळण, सर्विस रोडची दुरुस्ती कधी होणार ? 

सडक अर्जुनी, दिनांक : 23 जुलै 2024 : सौंदड ते फूटाळा येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था जैसे थे स्थितीमध्ये पुन्हा झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गेले पाच ते सहा वर्षे पासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वरील उड्डाण पुलाचे निर्माण कार्य राजदीप कंपनीकडून संत गतीने सुरू होते. या उड्डाण पुलाचे निर्माण कार्य कधी पूर्ण होणार अशी प्रतीक्षा वाहनधारका सह स्थानिक नागरिकांना आहे.

उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्विस मार्गावर ठिक ठिकाणी खड्डे पडले असून सर्विस मार्गाची पूर्णपणे चाळण झाली आहे. परिणामी वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो, वाहनधारकांना मार्ग शोधत चालावे लागते त्यामुळे सदर मार्गावर तासन तास वाहनांची रांग लागतात, विशेष म्हणजे सदर उड्डाण पुलाचे नव निर्माण कार्य गेले काही महिन्यापासून बंद आहे.

सदर ठिकाणी काम करणाऱ्या कंपनीने अनेक मजुरांचे पेमेंट केले नाही. तर काही अन्य लोकांचे देखील पेमेंट बाकी असल्याची वोरड आहे. तसेच कंपनीची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे सदर काम कुणी अन्य कंपनी करणार असल्याची चर्चा आहे. मात्र याबाबत आम्ही कुठलाही दावा करत नाही.

परंतु कंपनीने सदर उड्डाणपुलाचे नवनिर्माण कार्य का थांबवले हा चर्चेचा विषय बनला आहे. उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामामुळे सौंदड ते फुटाळा या परिसरात वाहनधारकाची मोठी कोंडी होते, याला दुसरे कारण म्हणजे चंद्रपूर ते गोंदिया रेल्वे मार्ग याच ठिकाणी आहे. या मार्गाने दिवसाकाठी अनेक रेल्वे गड्या धावतात त्यामुळे या मार्गावर सतत जाम असते.

परिणामी स्थानिक नागरिकांना तसेच वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो, विशेष म्हणजे या ठिकाणी तासन तास वाहनधारकांना ट्राफिक मोकळी होण्याची वाट पाहावी लागते, या ट्राफिकचा फटका स्थानिक नागरिकांना देखील होतो, त्यामुळे सदर उड्डाण पुलाचे नव निर्माण कार्य लवकरात लवकरच सुरू करण्यात यावे अशी स्थानिक नागरिकांची मागणी आहे. तसेच सर्विस रोडची दुरुस्ती करण्यात यावी असी ही मागणी करण्यात येत आहे.

Leave a Comment

और पढ़ें