बाघनदीच्या पूरात ट्रॅक्टर गेले वाहून, सिलापुर येथील घटना

गोंदिया, दी. 23 जुलै : जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिलापूर- पुराडा मार्गावरील बाघनदीच्या पुरात ट्रॅक्टर वाहून गेल्याची घटना घडली. यामध्ये ट्रॅक्टर चालकाचा अति शहाणपणा जीवावर बेतला असून कृष्णा मारोती वल्थरे (३०) रा पद्मपुर असे ट्रॅक्टर चालकाचे नाव आहे. त्याला स्वतःचे जीव वाचविण्यात यश आले असून ट्रॅक्टर बाघनदीत वाहून गेले आहे.

सद्या शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर रोजंदारीच्या महिलांना सोडायला गेले होते. पुलावरुन पुराचे पाणी जात असतांना सुद्धा चालकाने अती आत्मविश्वासाने पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर नेले. शिरपूरच्या मनोहर सागर धरणाचे वक्र दरवाजे उघडण्यात आल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून यामध्ये ट्रॅक्टर वाहून गेला.

हा संपूर्ण प्रकार मोबाईल मध्ये कैद झाली आहे. तर सदर व्हिडिओ आता सोशल मीडियावर फिरत आहे. गोंदिया जिल्ह्यात सध्या दमदार पावसाची हजेरी झाल्याने सर्वत्र जीवन, जल मय झाले आहे. त्या मुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून आपल्या जीवाची काळजी घ्यायला हवी.

 

Leave a Comment

और पढ़ें