सौंदड येथील स्वच्छतागृह तुंबले पाण्याने, पसरले घाणीचे साम्राज्य!, ग्रा.प. प्रशासनाचे दुर्लक्ष !

सडक अर्जुनी, दिनांक : 23 जुलै 2024 : तालुक्यातील ग्राम पंचायत सौंदड येथे 2022 – 2023 मध्ये लाखो रुपये खर्चून स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आली होती. या स्वच्छतागृहाच्या आजू बाजूला सध्या घाणीचे साम्राज्य पसरले असून मुख्य मार्गावर सर्वत्र पाणी तुंबलेल्या परिस्थितीत आहे. परिणामी या स्वच्छतागृहाचा कुठलाही सध्या उपयोग नाही. लाखो रुपये खर्चून तत्कालीन ग्राम पंचायत प्रशासनाने गावाचा विकास करण्या संदर्भाने मोठ्या घाईत 2022 – 23 मध्ये गावातील नागरिकांना स्वच्छतागृहाचा उपयोग व्हावा यासाठी निवडणुकीच्या काळात घाई घाई ने स्वच्छतागृहाचे निर्माणकार्य पूर्ण करून लोकार्पण केले होते. 

परंतु याच कालावधीत स्वच्छतागृहाची निर्मिती झाल्यानंतर स्वच्छता गृहाच्या बाहेर लावलेल्या ब्लॉकची तूट फूट झाली होती, याबाबत संबंधित अभियंता यांच्याशी आम्ही चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की अजून काम बाकी आहे. मात्र त्यानंतर या ठिकाणी कुठलेही काम झाले नाही. सध्या स्थिती स्वच्छतागृहाकडे जाणारे मार्ग पाण्याने तुंबलेले आहे. तर आजू बाजूला झाडे झुडपी तय्यार झाल्याने जंगला सारखे चित्र निर्माण झाले आहे.

हेच नाही तर स्वच्छतागृहाच्या आतील साहित्यांची सर्वत्र तोडफोड झाली असून दरवाजे देखील तुटलेल्या अवस्थेत आहेत, स्वच्छतागृहाच्या आत मध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असून इतकं विकृत दुर्गंधी पसरला आहे. की स्वच्छतागृहात जाण्यास नागरिक पसंत करत नाही. लाखो रुपये खर्चून तयार करण्यात आलेले स्वच्छतागृह सध्या वाऱ्यावर पडले असून, त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनाने याची स्वच्छता करून नागरिकांचे उपयोगात येणार अशी सोय उपलब्ध करून द्यावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

Leave a Comment

और पढ़ें