गोंदिया, दि. 22 जुलै : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 , या मार्गावर उड्डाण पुलाचे नवनिर्वाण कार्य अग्रवाल ग्लोबल नामक ही कंपनी करीत आहे, नुकत्याच तयार झालेल्या मार्गावर पहिल्याच पावसाळ्यात ठिक ठिकाणी खड्डे पडल्याने अग्रवाल कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 हा नागपूर ते रायपूर असा मार्ग असून या मार्गावर तीन ते चार ठिकाणी उड्डाणपुलाचे नवनिर्माण कार्य गेले तीन वर्षे पासून सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार अंदाजे साडेतीनशे ते चारशे कोटी रुपये खर्चून या उड्डाण पुलाचे तसेच काही भागातील रस्त्यांच्या कामचे नव निर्माण कार्य ( बांधकाम ) सुरू आहे.
व्हिडिओ मध्ये आपण चित्र पाहत आहात. हे दृश्य सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम डूग्गीपार ते नयनपुर या परिसरातील आहे. आणि हे मार्ग नुकतेच काही महिन्यांपूर्वी सुरू झाले आहे. यापूर्वी सदर मार्ग हा पूर्णपणे खराब होता. या मार्गाची दुरुस्ती करून पुनरनिर्माण करण्यात आले आहे.
मात्र नुकतेच नव र्निमान झाले असले तरी पावसाळा सुरू होताच अग्रवाल कंपनीने केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे झाले आहे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण देत आहे. रस्त्यावरील पडलेले खड्डे जेसीबीच्या माध्यमातून भरण्यात येत आहेत, परंतु महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना रस्ते शोधत चालावे लागत आहे.
रस्त्यांची पूर्णपणे चाळण झाली असून कंपनीने केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. त्याचबरोबर नवनिर्माण पुलावर देखील अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्या बाबद बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यामुळे कंपनीच्या कार्य प्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.