- विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपा आगोदर पदाधिकाऱ्यांनीच घेतला निर्णय.
गोंदिया, दि. 21 जुलै : विधानसभा निवडणुकीची जरी घोषणा झाली नसली तरी प्रत्येक पक्षाने आपल्या विधानसभा क्षेत्राकरिता उमेदवार शोधण्याची मोहीम सुरू केली आहे. गोंदिया जिल्ह्यात ज्याप्रमाणे लोकसभेत महाविकास आघाडीतील काँग्रेसला चांगलेच यश मिळाले त्या अनुषंगाने महाविकास आघाडीत काँग्रेस ने चारही विधानसभेवर दावा करत चारही विधानसभा लढण्याची इच्छा जाहीर केली आहे.
दुसरीकडे उबाठा शिवसेना कडून सुद्धा आपल्या हक्काच्या जागेची मागणी करत चारही विधानसभा लढण्याकरता आम्ही सुद्धा इच्छुक असल्याचे बोलून दाखवले, महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या निर्णया अगोदरच पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पेच वाढवीला आहे, यात उबाठा शिवसेनेत माजी आमदार रमेश कुथे यांचे पक्ष प्रवेश होण्याच्या चर्चेला उधाण आल्याने, गोंदिया विधानसभा क्षेत्रातील जागा उबाठा कडे येण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे, जर या जागेवर काँग्रेसने आपला दावा ठोकला तर मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होनार की काय ? असाच प्रश्न निर्माण होत आहे.
दरम्यान काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे सचिव अमर वराडे आणि पंकज यादव जिल्हाध्यक्ष उबाढा शिवसेना यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे की जिल्ह्यातील चारही विधान सभा क्षेत्रातील जागेवर ते आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करणार. आणि त्यांना यश देखील मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. येत्या काळात यामध्ये काय बदल होणार ते पाहण्यासारखे असेल.