उपस्थित मान्यवरांचे सत्कार करताना
गोंदिया, दि. दि. 21 जुलै : जिल्हयातील धान्य खरेदी संस्था चालकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी नुकतेच निवडून आलेल्या संचालकांनी गोंदियात चर्चा स्तराचे आयोजन केले असून या चर्चा सत्रात गोंदिया जिल्यातील धान्य खरेदी संस्था चालकांनी हजेरी लावली होती.
धान उत्पादक जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्यात मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन होत असून उत्पादित करण्यात आलेला धान्य जिल्हा मार्केटींग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळा मार्फत घेतला जातो मात्र गेल्या काही वर्षा पासून खरेदी करण्यात येत असलेल्या धान्याची उचल वेळेत होत नसल्याने आणि धान्यात येणारी घट पाहता धान्य खरेदी संस्था चालकांच्या समस्या वाढल्या आहेत.
मात्र गेल्या आठ वर्षा पासून द महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन मुबई यांच्या निवडणूका झाल्या नसल्याने तसेच संचालक मंडळ अस्तित्वात नसल्याने धान्य खरेदी संस्था चालकांच्या समस्या शाशन दरबारी मांडता येत नसल्याने धान्य खरेदी संस्था चालकांना याचा त्रास सहन करावा लागत होता मात्र गेल्या दोन महिन्यात द महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन मुबई यांच्या निवडणूका पार पडल्या असून नागपूर विभागातून दोन संचालक निवडून गेले यात अतुल पवार आणि अशोक हटकर हे दोघे निवडून गेल्याने पूर्व विदर्भातील धान्य उत्पादक शेतकऱ्यांच्या आणि धान्य खरेदी संस्था चालकांच्या समस्या सोडवू असे अश्वासन नुकत्याच निवडून आलेल्या संचालकांनी दिले आहे.
यावेळी अतुल पवार संचालक द महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन मुबई, अशोक हटकर संचालक द महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटींग फेडरेशन मुबई, खुशाल बोपचे माजी खासदार सह अन्य उपस्थित होते. आयोजित चर्चा सत्रात पूर्व विदर्भातील धान्य खरेदी संस्था चालकांच्या समस्या सोडविण्या संदर्भात चर्चा करण्यात आली असून लवकरच पणन विभागाचे मंत्री यांच्या सोबत मुबंईत बैठक आयोजित करून मार्ग काढू असे अश्वाशन संचालक मंडळाने दिली असून गोंदिया मार्केटींग फेडरेशन च्या जिल्हा कमेटी च्या वतीने नविर्वाचीत संचालक मंडळाचा या चर्चा सत्रात सत्कार करण्यात आला.