माजी आमदार रमेश कुथे बांधणार उबाठा चे शिवबंधन

  • भाजपा सोडल्यानंतर रमेश कुथे यांनी पकडली उबाठाची वाट
  • मातोश्रीवर जाऊन रमेश कुथे यांनी घेतली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट
  • शेकडो कार्यकर्तासह रमेश कुथे यांचा मुंबई येथे काही दिवसात पक्ष प्रवेश होण्याची शक्यता.

गोंदिया, दि. 21 जुलै : भारतीय जनता पार्टीच्या प्राथमिक सदस्यत्वाच्या राजीनामा दिल्यानंतर माजी आमदार रमेश कुथे हे काँग्रेसमध्ये सामील होण्याचा कयास लावण्यात आला होता, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले त्यांनी त्यांच्या स्वघरी भेट घेतल्याने, रमेश कुथे यांची काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश होण्याची चर्चा रंगली होती, मात्र आता माजी आमदार असलेले रमेश कुथे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात सामिल होणार असल्याची खात्रीशिर माहिती प्राप्त आहे.

मातोश्रीवर जाऊन रमेश कुथे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर यावर शिक्कामोर्तब लागला आहे. माजी आमदार रमेश कुथे यांच्या राजीनामा नंतर भारतीय जनता पार्टीला मोठा धक्का बसला होता, त्यांचे उभाठा मध्ये पक्षप्रवेश होणार असल्याने अनेकांच्या भुवया नक्की उंचावणार आहेत. 

Leave a Comment

और पढ़ें