- गेल्या अनेक वर्षांपासून मागणी परंतु अद्याप रस्ता न झाल्याने संतप्त झाले विद्यार्थी व नागरिक
- कुंभारटोली – पाऊलदौना रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था.
आमगाव, दि. 21 जुलै : शहराच्या लगतच असलेल्या कुंभारटोली आणि पाऊलडौना या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या मागणीसाठी आंदोलन , निवेदन तहसीलदार मार्फत शासनात देण्यात आले परंतु हा रस्ता बनत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी नागरिकांनी परिसरातील रस्त्यावरील खड्ड्यांवर धान पिकाची रोवणी करत आंदोलन केले आणि प्रशासक आणि शासनाला जागं करण्यासाठी आंदोलन करून हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा आणि चांगल्या प्रतीचा नवीन रस्ता बांधावा अशी मागणी केली आहे. आमगाव नगरपरिषद अंतर्गत असलेल्या कुंभारटोली आणि पाऊळदौंना या गावाला जाण्याकरिता रस्ता अनेक वर्षापासून खराब झाला होता, रस्ता दुरुस्तीबाबत निवेदन देण्यात आले होते परंतु अद्यापही या रस्त्याची दुरावस्था कायम आहे.
पावसाळा सुरू असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी साठलेल असते यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळा आणि कॉलेजेस मध्ये यायला मोठा त्रास सहन करावा लागतो अनेक नागरिकांना सुद्धा याचा त्रास होतो या मार्गावर अनेक अपघात सुद्धा झाली आहेत आणि विशेष म्हणजे याच मार्गाने महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ येथे जाण्याकरिता मोठमोठे ट्रक धानाने आणि तांदळाने भरलेले जात असतात त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
म्हणूनच हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर बांधकाम करण्यात यावा अशी मागणी आता नागरिक करत आहेत आणि त्याकरिता शासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी या भागामध्ये खड्डे पडलेले होते त्या खड्ड्यांमध्ये भात पिकाची रोवणी करून शासनाला जागी करण्यासाठी आंदोलन केले आणि लवकरात लवकर या रस्त्याचे बांधकाम करावे अशी मागणी केली आहे. आता शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागलेले आहे. तृप्ती पटले, विद्यार्थिनी, निर्मोली हरीणखेडे, विद्यार्थिनी, डॉ. अभय बोरकर, ग्रामवासी, रामेश्वर श्यामकुंवर, आंदोलनकर्ता, सुनंदा येरणे, माजी सरपंच कुंभारटोली सहा विद्यार्थी व गावकरी उपस्थित होते.