पावसाने केला कहर, काहींच्या घरात शिरले पाणी तर अनेक शेतकरी अडकले पुराच्या पाण्यात

गोंदिया, दी. 20 जुलै : गोंदिया जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुक्यातील हे दृश्य आहेत, जिल्ह्यामध्ये आज सर्वत्र पावसाने दमदार हजेरी लावली त्यामुळे नदी व नाले तुडुंब भरले तर काही भागात मुख्य मार्गावरुण देखील पानी वाहू लागले होते, आणि अशातच अनेक नागरिकांच्या घरामध्ये देखील पाणी शिरले तर शेतामध्ये काम करण्यासाठी गेलेले काही नागरिक पुराच्या पाण्यामुळे शेतामध्येच अडकले होते.

सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम सौंदड येथील रहिवाशी सुनील सोनवाणे यांच्या घरासमोर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी भरले तसेच त्यांच्या घरात देखील पाणी शिरल्याचे सोनवणे सांगत होते, त्यामुळे त्यांच्या घरात खाली ठेवलेले अनेक साहित्य खराब झाले, सोनवाणे यांचा आरोप आहे की राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर सुरू असलेले उड्डाण पुलाचे नव निर्माणकार्य याला जबाबदार आहे. कारण रेल्वे स्थानका कडून येणारे पाणी महामार्गाच्या बाजूने जाणारया नालीद्वारे जात होते,  परंतु त्या ठिकाणी उड्डाणपुलाचे काम सुरू आहे, त्या जागेतील नाली संपूर्ण भुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे सदर पाणी पास न होता त्यांच्या घरासमोर साचला आहे. यामुळे घरामध्ये सरपटणारे प्राणी येण्याची शक्यता नाकारता येत नाही, स्थानिक प्रशासनाने तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी मागणी सुनील सोनवाणे सह अन्य नागरिकांनी केली आहे.

तर शेतात काम करण्यासाठी गेलेले शेतकरी पुरात अडकल्याने चार शेतकऱ्यांना दोन गावातून रेस्क्यू करण्यात आले आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार गोंदियात देखील पावसाने 19 व 20 जुलै रोजी दमदार हजेरी लावली असून शेतात काम करायला गेलेले चार शेतकरी पुराच्या पाण्यात अडकल्याने रेस्क्यू करून काढण्यात आले आहे. पहिल्या घटनेत सडक अर्जुनी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या ग्राम दल्ली गावात शेती कामे करण्यासाठी गेलेले दोन शेतकरी हे नाल्याला अचानक पाणी वाढल्याने पुरात अडकले होते, त्या दोघांनी झाडावर चढून स्वतःचा बचाव करीत याची माहिती गावकर्यांना फोन वरून दिली, जिल्हा प्रशासनाच्या मदतीने निमराज शिवणकर आणि रामू पंधराम याना बाहेर काढण्यात यश आले आहे.

तर दुसरी घटना देखील सडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम पिपरी गावात घडली असून सकाळी शेतामध्ये काम करण्यासाठी गेले असता चुलबंध नदीला अचानक पूर आल्याने नदीचे पाणी शेतात शिरल्याने दोन्ही पिता पुत्रांनी शेतातील झाडावर चढत याची माहिती गावकर्यांना दिली असता बचाव पथकाच्या माध्यमातून दोन्ही पिता पुत्रांना पाण्या बाहेर काढण्यात आले आहे. शेतकरी रवींद्र फुंडे आणि अजय फुंडे असे दोन्ही शेतकऱ्यांचे नावे आहेत, यांचे शेतात ठेवलेले ट्रॅक्टर पाण्याखाली गेले आहे, विशेष म्हणजे दोन्ही घटनेतील शेतकाऱ्यांकडे मोबाइल अशल्यामुळे त्यांनी गावकऱ्यांशी संपर्क केला आणि बचाव पथक वेळेवर घटनास्थळी पोहचू शकले यावेळी गोंदिया येथील एन डी आर एफ ची टीम, पोलीस प्रशासनाचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते त्यांच्या अथक प्रयत्नातून शेतकऱ्याना रेस;कीव करण्यात यश आले आहे.

Leave a Comment

और पढ़ें