मोठी बातमी : पोलिस नक्षल चकमकीत 12 नक्षलवादी ठार, ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त!

( संग्रहित छायाचित्र )

गडचिरोली, दि. 17 जुलै : पोलिस आणि माओवादी यांच्यामध्ये आज 17 जुलै रोजी जोरदार चकमक झाली असून या चकमकीत गडचिरोली पोलिसांना 12 माओवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. डिजीटल वृत्त पात्रांनी दिलेल्या माहिती नुसार आज दुपारी जोरदार गोळीबार सुरू झाला तर संध्याकाळी उशिरापर्यंत 6 तासांहून अधिक काळ सुरू होता. परिसरात केलेल्या शोधामुळे आतापर्यंत 12 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत.

गडचिरोली येथून आज सकाळी एक ऑपरेशन सुरू करण्यात आले होते. ज्यामध्ये सी- 60 दल वांडोली गावातील छत्तीसगड सीमेजवळ पाठवण्यात आले होते. इंटला गावाजवळ 12-15 नक्षलवादी तळ ठोकून असल्याची पक्की माहिती पोलिसांना माहिती मिळाली, चकमकीनंतर आतापर्यंत 3 एके 47, 2 इन्सास, 1 कार्बाइन, 1 एसएलआर यासह 7 ऑटोमोटिव्ह शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. लक्ष्मण आत्राम, विशाल आत्राम, टिपागड दलमचे प्रभारी हे मृत माओवाद्यांपैकी एक असल्याची ओळख पटली आहे. माओवाद्यांची पुढील ओळख आणि परिसरातील शोध सध्या सुरू असलेल्याचे सांगण्यात येत आहे.

या चकमकीत सी- 60 दलाचा एक पोलिस उप निरिक्षक आणि एक जवान यामध्ये जखमी झाले आहे. ते धोक्याबाहेर असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांना नागपूरला हलवण्यात आले आहे. या ऑपरेशननंतर उपमुख्यमंत्री, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री गडचिरोली देवेंद्र फडणवीस यांनी वरील यशस्वी ऑपरेशनसाठी सी-60 कमांडो आणि गडचिरोली पोलिसांना 51 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले असल्याची माहिती मिळत आहे.

Leave a Comment

और पढ़ें