सडक अर्जुनी, दिनांक : 15 जुलै 2024 : तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत सौंदड हे सध्या विना अधिकाऱ्याने आहे. त्यामुळे गावातील अनेक नागरिकांचे कामे दाखल्याविना रखडले आहे. सौंदड ग्राम पंचायत येथे ग्रामविकास अधिकारी हे पद आहे. परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे येथील पद आता रिक्त झाला आहे. मात्र ज्या ग्रामसेवकांना या ठिकाणी अतिरिक्त चार्ज दिले होते ते अधिकारी मेडिकल लिव्ह वर गेले आहेत अशी माहिती बीडिओ यांनी दिली आहे.
ग्राम पंचायत सौंदड येथे दोन वर्षात दोन ग्राम विकास अधिकारी बदलले आहेत, तर बदली झालेल्या अधिकाऱ्याच्या ठिकाणी ज्यांना कुणाला अतिरिक्त चार्ज देण्यात येते ते अधिकारी मेडिकल लिव्ह वर निघून जातात, तालुक्यात सर्वात गाजलेली ग्राम पंचायत सौंदड आहे. सौंदड ग्रामपंचायत च्या नावाने अधिकारी वर्ग घामाघुम होतो, त्या मुळे अतिरिक्त चार्ज घेण्यासाठी काही ग्रामसेवक घाबरतात असे काहीसे चित्र आहे.
पूर्वी जगदीश नागलवाडे हे सौंदड ग्राम पंचायत येथे ग्रामविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते, त्यांनी कर्तव्यात काही कसूर केल्यामुळे त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. त्यानंतर गणेश मुनेश्वर हे ग्रामविकास अधिकारी या पदावर कार्यरत होते त्यांची विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्यामुळे ग्रामपंचायत सौंदड येथील पद रिक्त आहे.
या पदावर अतिरिक्त कार्यभार म्हणून एका ग्रामविकास अधिकाऱ्याला चार्ज देण्यात आले होते. परंतु सदर अधिकाऱ्यांनी मेडिकल लिव्ह घेतली आहे. अशी माहिती पंचायत समिती सडक अर्जुनीचे बीडिओ रविकांत सानप यांनी दिली आहे. तर यापूर्वी देखील म्हणजे जगदीश नागलवाडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते, तेव्हा देखील अतिरिक्त कार्यभार दोन ग्राम सेवकांना देण्यात आले होते, परंतु त्यांनी देखील मेडिकल लिव्ह घेतली होती.
सध्या सौंदळ ग्रामपंचायत येथील ग्रामविकास अधिकाऱ्यांच पद रिक्त आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी विना दाखल्याचे कामे रखडले आहेत. एकीकडे लाडली बहीण योजना शासनाने सुरू केली आहे. तर दुसरीकडे शाळेच्या मुलांना आवश्यक कागदपत्रे लागतात, ग्रामपंचायत मध्ये पद रिक्त असल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. या ठिकाणी लवकरात लवकर अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी होत आहे.