नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांच्या संख्येत झाली वाढ

गोंदिया, दी. 11 जुलै : गोंदिया भंडारा जिल्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात चंद्रपूर जिल्यातून तीन वाघ सोडण्यात आल्याने या वर्षी पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली आहे. भंडारा गोंदिया जिल्याचे वन वैभव समजल्या जाणाऱ्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २० मे २०२३ ला वनमंत्री सुधीर मुंगनटीवार यांच्या हस्ते दोन वाघ सोडण्यात आले होते, त्यापैकी एक वाघीण हि मध्यप्रदेशात निघून गेल्याने पुन्हा ११ एप्रिल २०२४ ला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एक वाघीण सोडण्यात आली.

तर दुसरीकडे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात T३ वाघिणीला बछडे झाल्याने वाघांची संख्या वाढली त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात जंगल सफारी करिता आलेल्या लोकांना वाघांचे सहज दर्शन होत असल्याने या वर्षी पर्यटकांची संख्या वाढली तर नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक हे येत असतात. मागील वर्षी 15 हजार पर्यटकानी या तीन महिन्यांमध्ये नवेगाव नागझिराला हजेरी लावली होती तर दुसरीकडे या वर्षी पर्यटकांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

17 हजार 332 पर्यटक या तीन महिन्यांमध्ये नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पा जंगल सफारी करिता आले आहेत तर मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी व्याघ्र प्रकल्पाच्या महसुलामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 31 लाख 60 हजार रुपये महसूल गोळा झाला होता तर यावर्षी पर्यटकांची संख्या वाढल्याने 42 लाख 17 हजार रुपये एवढा महसूल नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला पर्यटनातून मिळाला आहे तर या वर्षी विदेशी पर्यटकांनी सुद्धा नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला भेट दिली हे विशेष.

Leave a Comment

और पढ़ें