हरीष बन्सोड यांनी विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे केले वाटप

सडक अर्जुनी, दी. 11 जुलै : ग्रामविकास पूर्व माध्यमिक शाळा कोहळीटोला येथील 1 ते 7 च्या सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक व पेन चे वाटप आज दी.11 जुलै रोजी हरीषभाऊ बन्सोड तालुका अध्यक्ष काँग्रेस अनु. जाती सेल आणि संचालक कृषी उत्पन बाजार समिती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुरेश झोडे मुख्याध्यापक, नितु पटले, निता हटेले, शिवचंद राठोड शिक्षक शिक्षिका उपस्थित होते. कॉँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या विचार सरणीला लक्ष्यात घेता समाज सेवेचे काम आपणही करून पुण्य आपल्याही पदरी पाडून घ्यावे, म्हणून तालुक्यातील विविध शाळांना भेटी देऊन शाळेतील मुलांना कामी येणार अश्या साहित्याचा वाटप केले आहे.

तर अनेक गरिबांना मदत करून समाज सेवेचे काम आपण करीत अशल्याचे हरीषभाऊ बन्सोड यांनी सांगितले आहे, ग्रामीण भागातील मजूर व शेतकरी वर्ग आपल्या मुलांना शिक्षण शिकवण्यासाठी खूप काबाळ कस्ठ करते मात्र वाढलेली महागाई त्याला सावरू देत नाही, त्या मुळे पालक मुलांना पाहिजे त्या सुविधा देऊ शकत नाही, शाळेत लागणारे साहित्य देखील काही पालक आपल्या मुलांना देऊ शकत नाही, अशी परिस्थिति आजची आहे. त्या मुळे आपल ही समाजासाठी काही देण लागते म्हणून समाज सेवेची मनात जागरूकता निर्माण झाली असून गेल्या दोन वर्षे पासून हे कार्य सुरू आहे.

Leave a Comment

और पढ़ें