सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे ) दी. ११ जुलाई : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सडक अर्जुनी अंतर्गत येणारे क्षेत्र सहाय्यक कार्यालय शेंडा येथील कोयलारी वन विभाग परिसरात सागवान चिराण पकडण्यात अखेर वन विभागाला यश आले आहे. शेंडा सहवनक्षेत्रात अवैद्य सागवान तस्करीचे काम सुरू अशल्याची गुप्त माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली, मात्र सदर काम कुठे चालते याची पक्की खात्री वन विभागाला नवती, अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ( १० जुलै ) रोजी याचा सोध लावला आणि तीन आरोपी मिळाले.
एक लाकूड तस्कर आपल्या घरी सागवान वृक्षाची चिरान करीत असताना मिळाला यातील आरोपी नामे निलेश हिरालाल मेश्राम मुक्काम कोयलारी, तर राधेश्याम अंकुश नेवारे मुक्काम घटेगाव, बाबुदास रामाजी नेवारे मुक्काम घटेगाव असे असून यांनी वन विभागाच्या जागेतून सागवान जातीच्या वृक्षाची कत्तल करून आपल्या घरी आणून त्या सागवान वृक्षाची चिरान करीत असतांना मिळून आले, यात २५ नग सागवान पाट्ट्या मिळाल्या असून ०.५२५ घनमीटर सागवान वृक्षाचे चिरान आरोपीच्या घरून जप्त करण्यात आले आहे. एकूण मुद्देमाल अंदाजे ६० हजार रुपयाचा जप्त करण्यात आला असून चीरान करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहेत.
तिन्ही आरोपी विरुद्ध वन कायदा १९२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहिती नुसार, तिन्ही आरोपींना सडक अर्जुनी येथील मा. न्यायालयात आज ( दी. ११ ) रोजी हजर केले असता ( १४ जुलाई ) पर्यन्त वन कोठडी देण्यात आली आहे, आरोपींचा कसून तपास सुरू असून मोठे मासे गळाला लागण्याचे संकेत आहेत, शेंडा परिसरात अवैध चिरान पकडण्यात आल्याने परिसरातील सागवान तस्करांचे धाबे दणाणले आहेत. सदर कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी मिथुन तरोणे यांच्या मार्गदर्शनात शेंडा येथील क्षेत्र सहाय्यक वर्षा रहिले, जांभळी येथील क्षेत्रसहाय्यक उमेश गोटेफोडे, वनरक्षक दिलीप माहुरे, शालु मेंढे, तिलोतमा भेलावे, अक्षय नंदेश्वर, संजय चव्हाण यांनी केली आहे.
त्या मुळे दोन अधिकारी सस्पेंड झाले होते.
कारवाई झालेल्या परिसरात या पूर्वी मोठ्या प्रमात सागवान वृक्षांची अवेध रित्या तस्करी व्हायची, या भागातिल काही ठेकेदार या कामात सक्रिय देखील आहेत, त्या मुळे या पूर्वी शेंडा येथील क्षेत्र सहाय्यक आणि वन परिक्षेत्र अधिकारी सडक अर्जुनी अश्या दोन अधिकाऱ्यांना वरिस्ठानी सस्पेंड केले होते, त्या मुळे या परिसरात आज पर्यन्त शांती होती, परंतु झालेल्या कारवाई मुळे असे लक्ष्यात येते की आता पुन्हा या भागात अवेध सागवान वृक्ष तोडीला सुरवात झाली आहे.