महसूल विभागाची कारवाई, अवेध गौण खनिज वाहतूक करणारे १० वाहन जप्त, ३० लाखाचे दंड

गोंदिया, दी. २० जून : जिल्ह्यातील आमगाव तहसील कार्यालय अवैध गौण खनिज वाहतुकीच्या बाबतीत ॲक्शन मोडवर आला असून ज्या दिवशी तहसीलदाराच्या वाहन चालकाला मारहाण झाली त्यानंतर आमगाव तहसीलदार यांनी तीन पथक तयार करून या पथकामध्ये नायब तहसीलदार, तलाठी, कोतवाल यांचे समावेश करून तालुक्यातील ज्या ज्या ठिकाणी अवैध गौण खनिज वाहतूक केली जाते अश्या ठिकाणावर करवाई करण्याचे काम केले आहे.

यामध्ये रेती, मुरूम, गिट्टी आणि माती चा समावेश आहे, अवैध रित्या उत्खनन करून वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू केले असून दोन दिवसात 10 वाहनांवर कारवाई  करण्यात आली आहे, या धडक कारवाई मध्ये १० वाहन विना परवानगी गौण खनिजाची वाहतूक करीत असताना आढळले आहे, त्यांच्यावर जवळपास 30 लाखाचे दंड ठोठावण्यात आले आहे, त्यामुळे आमगाव तालुक्यातील अवैध रित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

या प्रकारची कारवाई जिल्ह्यातिल अन्य तालुक्यामध्ये ही व्हावी अशी अपेक्षा नागरिक करीत आहेत. पथक 24 तास कार्यरत असल्याचे तहसीलदार रवींद्र होळी यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांवर चाप बसणार आहे हे मात्र नक्की.

Leave a Comment

और पढ़ें