११० जागांसाठी आले ८ हजार २६ अर्ज, पोलीस भरती प्रक्रिया जवळजवळ १७ दिवस चालणार
गोंदिया, दि. १८ जुन 2024 : जिल्हा पोलीस आस्थापनेवरील रिक्त पोलिस शिपाई व पोलिस शिपाई चालक पदाची पोलिस भरती प्रक्रिया १९ जूनपासून सुरू होत असून ११० पोलिस कर्मचारी जागांसाठी ८ हजार २६ उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले आहेत. पोलिस भरती अत्यंत पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलिस मुख्यालयाच्या विविध ग्राऊंडवर ७० कॅमेरे लावण्यात आले आहेत.
हे कॅमेरे पोलिस भरतीची प्रत्येक बाब टिपणार असल्याचे पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी माध्यमांना सांगितले. गोंदिया जिल्हा पोलिस भरतीची संपूर्ण भरती प्रक्रिया गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा यांच्या नेतृत्वात पोलिस मुख्यालय कारंजा, गोंदिया येथे १९ जून २०२४ रोजी सकाळी ५ वाजतापासून घेण्यात येणार आहे.
आमिष देणाऱ्यांचे नाव डायल ११२ वर सांगा पोलीस अधीक्षकांचे आवाहन
पोलिस भरती संदर्भात वशिला लागत असल्याच्या भूलथापा कुणी देत असेल तर त्या व्यक्तीचे नाव जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावे, पोलिस अधीक्षक गोंदियाच्या ई मेलवर किंवा डायल ११२ वर माहिती द्यावी. जेणेकरून त्या आमिष देणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे म्हणाले.
लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.
शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे उमेदवारांची गुणवत्तेनुसार तात्पुरती निवडसूची तयार करण्यात येईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केल्यानंतर पात्र ठरलेल्या उमेद- वारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल. संपूर्ण पोलिस भरती प्रक्रिया ही पारदर्शकरीत्या पार पाडण्यात येत आहे.
पोलीस भरती प्रक्रिया जवळजवळ १७ दिवस चालणार
पोलिस शिपाई ११० जागांसाठी ८ हजार २६ अर्ज प्राप्त झाले आहेत. पोलिस मुख्यालय कारंजा गोंदिया येथे सर्वप्रथम महिला उमेदवारांची शारीरिक व मैदानी चाचणी प्रक्रिया घेण्यात येणार आहे. ही पोलिस शिपाई भरती १६०० मीटर, ८०० मीटर, १०० मीटर
पोलिस भरतीच्या ११० जागांसाठी २ हजार ३७२ महिलांचे अर्ज
जिल्हा पोलिस आस्थापनेवरील ११० पोलिस शिपाई पदभरतीसाठी ८ हजार २६ अर्ज आले आहेत. त्यात २ हजार ३७२ महिला, दोन तृतीयपंथी व ५ हजार ६५२ पुरुषांचे अर्ज आले आहेत. ज्या उमेदवारांना ज्या तारखेचे हॉल तिकीट प्राप्त झाले आहे. त्यांना त्याच दिवशी प्रवेश देण्यात येणार आहे. कुठल्याही कारणाने, एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कळवावे त्यानुसार त्यांचा चाचणीचा वेळ बदलवून देता येईल त्यासाठी अर्ज करावे.
सर्वप्रथम उमेदवारांचे प्रवेशपत्र स्वीकारल्यानंतर उंची, वजन, छाती मोजमाप यामध्ये पात्र उमेदवारांची शारीरिक मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. महिलांच्या मैदानी चाचणीनंतर पुरुष उमेदवाराकरिता १०० मीटर धावणे, १६०० मीटर धावणे, गोळा फेक व महिला उमेदवारा- करिता १०० मीटर धावणे, ८०० मीटर धावणे व गोळा फेक घेण्यात येईल.
