गोंदिया, दि. 09 जुन : शहरातील प्रॉपर्टी डीलर महेश दखने वय वर्ष (35) यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची घटना आज 09 जुन रोजी सकाळी 9 : 45 वाजता किसान चौक छोटा गोंदिया येथे घडली आहे. गोंदिया शहरातील महेश दखने हे आपल्या टू व्हीलर गाडीने जात असतांना अज्ञात हल्लेखोरांनी पाठलाग करत डोक्याच्या मागच्या बाजूला हातोडा, कुऱ्हाडी, तलवार आदी हत्याराने वार करून गंभीर जख्मी केले.
त्यामुळे महेश दखणे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडले. घटनास्थळावर आरडाओरडा ऐकून काही लोक धावले मात्र हल्लेखोर पळून गेले होते. स्थानिक नागरिकांनी गंभीर जखमी महेश दखणे यांना बेशुद्ध अवस्थेत खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
बराच वेळ पडून राहिल्याने व जास्त रक्तस्त्राव झाल्याने महेश दखणे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची महिती आहे. घटनेची नोंद गोंदिया शहर पोलिसांनी घेतली असुन घटनेचा तपास सुरू आहे.
