तलाठी मुख्यालयात राहत नसल्याने तालुक्यात वाढले चोरीचे प्रमाण.
सडक अर्जुनी, ( बबलू मारवाडे : महाराष्ट्र केसरी न्यूज डिजिटल ) दि. 08 जुन 2024 : तालुक्यातील रेंगेपार – पांढरी परिसरातील एका महसूल विभागाच्या नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रित्या रेतीचा उपसा करुन वाहतूक केली जात असल्याचे चित्र आहे. असे असले तरी याकडे स्थानिक महसूल विभागाचे सातत्याने हेतूस परस्पर दुर्लक्ष होत आहे.
हा प्रकार तलाठी साजा क्रमांक 11 येथील आहे. स्थानिक तलाठी मुख्यालयात राहत नसल्यामुळे सदर भागात मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार सुरू आहेत. तलाठी व मंडळ अधिकारी यांचे हेतू परस्पर दुर्लक्ष गोणखणीज वाहतूक करणाऱ्या लोकांकडे होत असल्याने खुलेआम रेतीची चोरी या भागातून सुरू आहे.
अवैध रित्या गौण खनिज उत्खनन करणाऱ्या माफियांन कडून कारवाई न करण्यासाठी प्रति वाहन 10 हजार रुपये एन्ट्री कथीत अधिकाऱ्याला देण्यात येत असल्याचे ही दबक्या आवाजात बोललं जात आहे.
स्थानिक रेती माफियांनी या नाल्यातील रेतीचा पावसाळ्यापूर्वी मोठ्या प्रमाणात उपसा करुन त्याची साठवणूक अनेक ठिकाणी करून ठेवली आहे. रेती माफिया रात्रीच्या वेळेस रेवणी नाल्यातून रेतीचा उपसा करुन त्याची ट्रॅक्टरने वाहतूक देखील करतात.
हा प्रकार मागील बऱ्याच महिन्यापासून सुरू आहे. पण संबंधित विभागाकडून कुठलीच कारवाई होत नसल्याने रेती माफियांची हिंमत वाढत आहे. जिल्ह्यात रेती डेपो सुरू झाले नसल्याने रेती माफिया रेतीची अतिरिक्त दराने विक्री करीत आहे. यामुळे बांधकाम करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांची लूट होत आहे.
रेवणी नाला हा प्रादेशिक वनविभाग व नागझिरा अभयारण्याला लागून आहे. तर हा परिसर कोर झोनमध्ये येतो. असे असले तरी या परिसरातून रेतीची अवैध वाहतूक सुरू असल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. पण या प्रकराकडे वन्यजीव व महसूल विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
रेंगेपार नाल्याची रेती मालिजुंगा, पांढरी, डुंडा, मुरपार / राम, कोसमतोंडी परिसरात अधिक दराने विक्री केली जात आहे. रेती माफियांनी पांढरी, मालिजुंगा, रेंगेपार या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीची साठवणूक करुन ठेवली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी देखील होत आहे.
