सडक अर्जुनी, दि. 07 जुन 2024 : मौजा सौंदड येथील पिपरी व सौंदड रेती घाटातील मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधारित्या चोरी होत असल्याबाबदचे लेखी निवेदन ग्राम पंचायत सौंदड ने उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोर., तहसीलदार सडक अर्जुनी आणि मंडळ अधिकारी सौंदड यांना 29 मे 2024 रोजी लेखी स्वरूपाचे निवेदन जावक क्रमांक : 92/2024 नुसार दिले आहे. निवेदन देऊन सुधा संबंधित विभागाने अद्याप कुठलीही कारवाई केली नसल्याने रेतीची चोरी मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचे सरपंच हर्ष मोदी यांचे म्हणणे आहे.
मौजा सौंदड हे गाव तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून या गावाला नदीने वेढले आहे. चुलबंद नदीच्या पात्रामधून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असते त्या नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात रेती साठा तयार झाला आहे. परंतु 2024 मध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील सध्यास्थीतीत एकही रेतीघाट लिलावात नाही. तरी पण पीपरी व सौंदड़ रेती घाटातील रात्री व दिवसा मोठ्या प्रमाणात रेतीची अवैधारित्या वाहतुक करून उपसा करून रेतीची डंपिंग अवैधरित्या केली जाते.
मात्र महसूल विभागाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. अवैध रेतीचा उपसा करून वाहतूक करणार्या रेती माफियावर आपल्या विभागाकडून कारवाई करण्यात यावी. कारवाई न केल्यास आंदोलन केले जाईल असे ग्राम पंचायत सौंदड यांच्या निवेदनात म्हटले आहे.
सडक अर्जुनी तालुक्यातील अनेक नदी व नाल्यातून रेतीची मोठ्या प्रमाणात अवैध रित्या चोरी होत आहे. मात्र तालुका महसूल विभागाचे याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. महसूल विभाग दुर्लक्ष का करते हा संशोधनाचा विषय असला तरी अवैध रित्या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहणाकडून एन्ट्री वसूल केली जात असल्याची चर्चा तालुक्यात आहे. या एन्ट्री तून कुणा कुणाला लक्ष्मीचे दर्शन होतात हा देखील संशोधनाचा विषय आहे. अनेक वृत्त प्रकाशित करून देखील कुंभकर्णी झोपेत असलेले महसूल विभाग सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्या मुळे तालुका महसूल विभागाला रोज लाखों रुपयाचा चुना लागत आहे.
