गोंदिया, दि. 24 मे 2024 : ‘लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहचा’ वाहनचालकांना सुरक्षित प्रवासासाठी ही म्हण व एकप्रकारे संदेश देण्यात आलेला आहे. मात्र यानंतरही बहुतांश वाहनचालक याकडे दुर्लक्ष करून, नियमांना तुडवून भरधाव वेगात वाहन चालवितात, यातूनच अपघात घडतात. गोंदिया जिल्ह्यात मागील 120 दिवसांत घडलेल्या अपघातांमध्ये 90 टक्केपेक्षा जास्त अपघात वाहनांच्या भरधाव वेगामुळे झाल्याचे समजून आले आहे.
अशात गोंदिया जिल्हाभरातील विविध मार्गावर गत 120 दिवसांमध्ये 98 अपघातांत 47 जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी वाहनधारकांची चिंता वाढविणारी आहे. यावरून ‘अति घाई अन् संकटात नेई’ अशीच स्थिती सध्या दिसून येत आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन पोलिस विभागाने केले आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 330