सडक अर्जुनी दिनांक 05 मे 2024 : सध्या सर्वत्र राज्यामध्ये उन्हाच्या तळाख्याचे दिवस आहेत. रगरगत्या उन्हात थंडगार पाणी पिण्यासाठी मिळावे अशी अपेक्षा असते, हॉटेलमध्ये बाटलीबंद पाणी मिळत असल्याने माठाच्या पाण्याकडे नागरिकांची पाठ झाल्याचे चित्र आहे. मातीचे मटक्याचा वापर पूर्वी मोठ्या प्रमाणात होत असे, आणि याच कालावधीमध्ये मातीचे भांडी निर्मिती करणारे कुंभार समाजातील नागरिक आपला उदरनिर्वाह करत असे, मात्र सध्याचे युगामध्ये फ्रिज चा वापर मोठ्या प्रमाणात वाढल्याने मातीचे निर्मित माठांकडे ग्राहक पाठ फिरवत असल्यामुळे माठ निर्मिती करणारे अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.
ज्या व्यवसायावर कुटुंबाचा गाळा चालतोय तोच व्यवसाय आता अत्यंत अल्पावधीवर पोहोचल्याने माठ विक्रेत्या परिवारावर उपासमारीची पाळी आली आहे. सध्या गोंदिया जिल्ह्यामध्ये 41, 42, आणि 43° c च्या वर पारा चढला आहे. असे असले तरी या रखरखत्या उन्हामध्ये माठ विक्री करिता मातीचे भांडे तयार करणारे कुंभार समाजातील नागरिक माठ विक्री करता बसतात.
माठ विक्रेत्यांशी आम्ही चर्चा केली असता त्यांनी सांगितले की पूर्वीपेक्षा आता माठाकडे ग्राहकांची पाठ झाल्याने आमचा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे आमच्यावर उपास मारीची वेळ आली आहे. याच व्यवसायावर आमच्या परिवाराचा गाळा चालतो मात्र ग्राहक पाहिजे तसा प्रतिसाद देत नसल्यामुळे आमचा व्यवसाय अत्यंत कमी प्रमाणावर आला आहे. पूर्वी मोठ्या प्रमाणात ग्राहक माठाला पसंती देत होते त्यामुळे माठ निर्मिती करणाऱ्या आणि विक्री करणारे नागरिकांना नफा देखील मोठ्या प्रमाणात मिळत होता, त्या नफ्यामुळे परिवाराचा गाडा चालत होता, मात्र आता फ्रिजचे युग आल्यामुळे ग्राहक माती निर्मित माठाकडे पाठ करीत असल्याचे चित्र आहे. तसे पाहिले तर पिण्यासाठी फ्रिज पेक्षा माठाचे पाणी अति उत्तम मानले जाते, परंतु सध्याचे युग मॉडर्न असल्यामुळे माठाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचे चित्र आहे.