- गोंदिया व भंडारा येथील राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी साधला संवाद
गोंदिया, दी. २१ डिसेंबर : सर्व सामान्यांच्या, शेतकऱ्यांच्या हितासाठी व विकासासाठी शासनाच्या वतीने अनेक निर्णय घेण्यात येत आहेत. शासन आपल्या दारी या उपक्रमातून जनतेशी प्रत्यक्ष संपर्क येतो या माध्यमातून त्यांच्या समस्या व अडी-अडचणी जाणून घेता येतात व ती सोडविण्याचा प्रयत्न आम्ही करतो. शासनाची विकासाची कामे जनतेपर्यंत सांगण्याचे काम आपण सर्वांनी करावे असे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते.
भंडारा व गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक २० डिसेंबर रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नागपूर येथील विजयगड, शासकीय निवासस्थानी संपन्न झाली. गोंदिया व भंडारा जिल्ह्यात खा. प्रफुल पटेल आपण सर्वांच्या पाठीशी सोबत खंबीरपणे उभे आहेत. पक्ष वाढीसाठी आगामी काळात पक्षाचा विस्तार व संघटन मजबूत करण्याकरीत जे गेले त्यांची चिंता न करता जे सोबत आहेत त्यांना सोबत घेऊन पक्षाचा विस्तार व वाढीसाठी कार्यकर्त्यांनी ताकतीने कामाला लागावे. आगामी निवडणुकांमध्ये आपले जास्तीत जास्त लोक निवडून येतील यासाठी प्रयत्न करावे. दोन्ही जिल्ह्यातील सिंचनाची व विकासाची कामे खा. पटेल यांच्या प्रयत्नाने पूर्ण झालेले आहेत.
काही प्रलंबित कामांना लवकरच पूर्ण करू असे आश्वासन अजित पवार यांनी दिले. माजी आमदार राजेंद्र जैन यांनी खा. प्रफुल पटेल यांच्या नेतृत्त्वात भंडारा व गोंदिया जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी सुविधा व जिल्हाच्या विकासाकरिता मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी केली. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, मनोहर चंद्रिकापुरे, राजूभाऊ कारेमोरे व जिल्हाध्यक्ष, महिला, युवक, सर्व सेलचे प्रमुख, जी.प. व प.स. चे सदस्य, नगरपरिषद व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
