सडक अर्जुनी, दी. २१ डिसेंबर : नाटक हे समाज प्रबोधनाचे उत्तम माध्यम आहे. त्यामुळेच नाटकामध्ये झाडीपट्टीतील कलावंत काम करीत असतात. त्यातच ग्रामीण भागातील कलावंतांच्या सुद्धा समावेश असतो मात्र नाटकाचे माध्यमातून जे कलावंत उत्कृष्टरित्या काम करतात त्यांना पुढे येण्याची संधी प्राप्त होत असून आपल्या अंगी असलेले कला गुण कशाप्रकारे पुढे आणता येतील याच्या सातत्याने प्रयत्न करावा असे प्रतिपादन डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांनी व्यक्त केले.
तालुक्यातील बोथली येथे कोदावस मंडई निमित्त ढीवर व माळी समाज नाट्य मंडळ बोथली चे सौजन्य आयोजित वीरा तू परतून ये रे…, नाटकाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून मार्गदर्शन करताना ते बोलत होते. नाटकाचे उद्घाटन ढीवर समाज संघटनेचे संचालक संजय केवट नागपूर यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर पंचायत समिती उपसभापती शालिंदर कापगते, सरपंच शारदाताई चव्हाण, माजी जी. प. उपाध्यक्ष छायाताई चव्हाण, खजरी येथील सरपंच महेश गहाणे, माजी सरपंच छायाताई टेकाम, उपसरपंच दिगंबर चव्हाण, जिल्हा युवा काँग्रेस उपाध्यक्ष निशांत राऊत, नगरपंचायत बांधकाम सभापती अंकित भेंडारकर, संघर्ष वाहिनी संयोजक गोंदिया उमराव मांढरे, गुड्डू डोंगरवार, भुमेश्वर शेंडे, मधुकर मोहुरले, मुकेश चव्हाण, पत्रकार बिरला गणवीर, कमलेश वालदे, वासुदेव राऊत ग्राम पंचायत सदस्य, ज्योतीताई मेश्राम, निर्मलाबाई उरकुडे, मीराबाई भोयर, जितू झिंगरे, मामताबई भोयर, मारोती मांदाले, मिलिंद चव्हाण, प्रकाश भुमके आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक कृष्णा भोयर यांनी तर संचालन महेंद्र मांदाले यांनी केले.