हर्ष विनोदकुमार मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौंदड देताय सुप्रशासनाचे दाखले, मासिक सभेचा अहवाल केलं जाहीररीत्या प्रसिद्ध


प्रतिनिधी / सडक अर्जुनी, दि. 19 डिसेंबर : ग्राम पंचायत सौंडद येथे डिसेंबर महिन्याची मासिक सभा दिनांक १५ डिसेंबर रोज शुक्रवारला सकाळी ११ वाजे पासून सुरू करून दुपारी ०१ वाजता संपन्न झाली. सभेमध्ये अनेक विषयासंबंधी चर्चा करून ठराव करण्यात आले.

या मासिक सभेचे पूर्ण अहवाल ४.५० वाजता ग्राम पंचायतीच्या नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करण्यात आले. आज पर्यंत कोणत्याही ग्राम पंचायत मध्ये मासिक सभेत होणारे ठराव आणि माहिती कधीही जाहीररीत्या प्रकाशित केली गेली नाही.

परंतु सौंदड ग्राम पंचायतीमध्ये प्रत्येक मासिक सभा आणि ग्राम सभेचे अहवाल प्रकाशित केले जाते. डिसेंबर महिन्याची मासिक सभेचे अहवाल मात्र ३ तासातच प्रकाशित झाल्याने संपूर्ण परिसरात सरपंच हर्ष मोदी यांच्या कार्यावर प्रशंसेचे वर्षाव होत आहे.
मासिक सभेचा अहवाल सारख्याच दिवशी सार्वजनिकरीत्या प्रकाशित करून सरपंच हर्ष मोदी यांनी सूप्रशासनाचे उदाहरण देवून सर्व ग्राम पंचायतीला नवे आव्हानच केले आहे.

यापूर्वी सत्तेमध्ये असलेले लोक प्रतिनिधी माहीतीचा अधिकार लावल्यावर सुधा माहिती देण्यास ग्राम सेवकांच्या विरोध करीत होते. त्या मुळे आता नवा सरपंच निवडून आल्याने गावातील प्रशासन पारदर्शक झाल्याचे चित्र आहे.


 

Leave a Comment

और पढ़ें