- पाथरी आणि बाम्हणी या दोन ग्राम पंचायत च्या ग्राम सेवकाणे केले शासकीय निधीचा गैरवापर!
प्रतिनिधी / सालेकसा, ( राहुल हटवार ), दी. 14 डिसेंबर : ग्राम पंचायत पाथरी आणि बामणी येथे कार्यरत असलेली ग्राम सेवक संजु खोब्रागडे यांनी शासकीय निधीचा गैरवापर करत वैयक्तिक स्वार्थासाठी वापर केले. असे आरोप स्थानिक ग्राम पंचायत सदस्य यांनी केले असता त्यांच्या विरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घोटाळ्यात ग्रामसेवक सह सरपंच यांचे पती अशोक दमाहे व ग्राम पंचायत कर्मचारी यांचा समावेश आहे. असा आरोप ग्राम पंचायत सदस्यांनी केले आहे. याचा समर्थनात तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन सादर करत चौकशी तात्काळ आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात यावे तसेच जो पर्यंत चौकशी पूर्ण होत नाही.
तो पर्यंत संबंधित ग्राम सेवक यांना तात्पुरते निलंबित करण्यात यावे. जर चौकशी मध्ये दोष सिद्ध झाल्यास त्यांना पूर्णकाळ निलंबित करावे अशी मागणी निवेदनाच्या माध्यमाने करण्यात आली आहे. निवेदन सोबतच बँकेचे स्टेटमेंट सुद्धा पुराव्याच्या रूपाने प्रसिध्द करण्यात आले ज्यावरून ग्राम पंचायत निधीचा वापर खाजगी कामासाठी झाले असल्याचे बोलले जात आहे. या विषयाला घेवून पोलिस स्टेशन सालेकसा येथे सुद्धा निवेदन सादर करण्यात आले आहे.
तर १८ डिसेंबर पासून उपोषण करणार
येत्या १५ डिसेंबर पर्यंत चौकशीचे सूत्र हालले नाही तर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने पंचायत समिती आवारात उपोषण करण्याचे आवाहन तालुका अध्यक्ष राजू दोनोडे यांनी केले आहे. चौकशी निष्पक्ष आणि प्राधान्याने करावे असेही यावेळी माहिती दिली.