डॉ. सुगत चंद्रिकापुरे मंचावरून मार्गदर्शन करताना…
सडक अर्जुनी, दी. 14 डिसेंबर : सौंदड येथे विठ्ठल रखुमाई मंदिर पटेल वार्डात श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन 11 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत करण्यात आले असून, भागवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे उद्घाटन डॉ. सुगत चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भागवताचार्य पूज्य साध्वी सु. श्री. यशोदा माई गायत्री शक्तीपीठ जवाहर नगर पेट्रोल पंप ह्या लाभले.
उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मंचावर पंचायत समिती सदस्य वर्षा शहारे, माजी सरपंच गायत्री ताई इरले, माळी समाज संघ जिल्हाध्यक्ष सदाशिव विठ्ठले, ग्रामपंचायत सदस्य रोशन शिवणकर, अर्चना डोंगरवार, तमुस. अध्यक्ष चरणदास शाहारे, मंदिराचे अध्यक्ष सुरेश झोडे, बिरला गणवीर, कमलेश वालदे, छगन डोंगरवार, आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार यादोराव डोंगरवार यांनी मांनले. कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य नागरिक महिला बालगोपाल उपस्थित होते.