संत जगनाडे महाराज यांची जयंती श्रीरामनगर/सौंदड येथे साजरी. 


सडक अर्जुनी, दी. 12 डिसेंबर : श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची ३९९ वी जयंती, श्री संताजी जगनाडे महाराज स्मारक समिती, श्रीरामनगर / सौंदड येथे दिनांक 8 डिसेंबर 2023 रोजी साजरी करण्यात आली. संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पमाला अर्पण करण्यात आली. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवराम गिन्हेपुंजे, अध्यक्ष कृषी उ. बा. स. लाखनी हे उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उद्‌घाटक डॉ. सोमदत्त करंजेकर, अध्यक्ष वैनगंगा बहुद्देशीय विकास संस्था साकोली, कार्यक्रमाचे दीप प्रज्वलक राजेश चांदेवार, कार्याध्यक्ष विदर्भ महासंघ तेली समाज, संगिताताई खोब्रागडे पं.स. सभापती, गौरेश बावणकर, तालुका अध्यक्ष तेली समाज, मुख्य अतिथी डॉ. घनश्याम निखाडे उपप्राचार्य करंजेकर अभियांत्रिकी महाविद्यालय साकोली, निशाताई तोडासे जि.प.स. गोंदिया, वर्षाताई शाहारे पं. स. सडक/अर्जुनी, हर्ष मोदी सरपंच ग्रापंचायत सौंदड, रत्नमालाताई शेंडे सरपंच ग्रा.पं. श्रीरामनगर, नरेश मडावी उपसरपंच ग्रा.पं. श्रीरामनगर, राजु मडावी आदी. समाज अध्यक्ष श्रीरामनगर, तुलाराम चांदेवार, देविदास लोहकर, भाजीपाले मॅडम जि. प. प्रा. शाळा श्रीरामनगर, जागेश्वर चांदेवार माजी ग्रा. स. श्रीरामनगर, कमलेश नवखरे बीटरक्षक पवनी, भरत पंधरे माजी सरपंच ग्रा. श्रीरामनगर, प्रेमराज बनसोड पो. पा. श्रीरामनगर, सीमाताई निंबेकर पो. पा. सौंदड आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच प्रास्ताविक हिवराज गायधने यांनी केले. सदर कार्यक्रमात इयत्ता १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव चिन्ह व शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धेतील विजेत्यांचा सत्कार करण्यात आला व डॉ. घनश्याम निखाडे साकोली यांनी नुकतीच पीएचडी मिळाल्याबद्दल तेली समाजाच्या वतिने सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामपंचायत श्रीरामनगर येथील माजी सरपंच व सदस्य यांची देखील तेली समाजाच्या वतीने शाल देऊन सत्कार करण्यात आले.

शिवराम गिन्हेपुंजे यांनी आपल्या मार्गदर्शनात संतांना जात नसतो ते सर्व जाती धर्माच्या उत्थानासाठी काम करतात असे सांगितले तर इतर उपस्थितानी मोलाचे मार्गदर्शन केले, कार्यक्रमाच्या यशवितेसाठी नरेश चांदेवार, रविंद्र नवखरे, एकनाथ नवखरे, राजेश गायधने, तुलाराम गायधने, खुशाल माहुरे, प्यारेलाल चांदेवार, नरेश चांदेवार, संजय चांदेवार, बबन निंबेकर, मोतीलाल भिवगडे, भाऊलाल चांदेवार, नरेश चांदेवार यांनी सहकार्य केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देविदास निंबेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रीती चांदेवार यांनी मानले. कार्यक्रमाला श्रीरामनगर सौंदड व इतर गावातील समाजबांधव उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें