नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत दया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तहसीलदार यांना निवेदन


सडक अर्जुनी. दि. 12 डिसेंबर : तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकासह अन्य पीक व पशु चाऱ्यांचा नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून हेक्टरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात यावी यासंदर्भात तहसीलदार सडक अर्जुनी यांच्या मार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका सडक अर्जुनी तर्फे निवेदन 11 डिसेंबर रोजी देण्यात आले.

दि. 28 नोव्हेंबर पासून तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उभे पीक खराब झाले. शेतात ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याला कोंब फुटला आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. परिणामी तालुक्यातील शेतकरी हतबल झाला आहे.

आणि शेतकऱ्यांचा उदरनिर्वाहचा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या धान पिकासह अन्य पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावे. या मागणीचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना सडक अर्जुनी तर्फे दि.11 डिसेंबर रोजी देण्यात आले. यावेळी तालुका अध्यक्ष अमोल लांजेवार, संघटक बबन बडोले, कवी अश्लेष माडे, प्रवीण उके, हिमांशू माडे, धर्मेंद्र वरकडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें