- आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या प्रयत्नाने सौंदड गावात पहिल्यांदाच 45 लक्ष रुपये च्या मंजूर निधीतून विकास कामे होणार !
- लोकसभा व विधानसभा चे निवडणूक लागण्यापूर्वी सौंदड गावाला एक कोटी रुपयाची निधी मंजूर करून देणार : आ. चंद्रिकापुरे
सडक अर्जुनी, दी. 09 डिसेंबर : तालुक्यातील ग्राम सौंदड येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन अर्जुनी मोर विधान सभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते आज 09 डिसेंबर रोजी संपन्न झाले.
यावेळी सौंदड येथील सरपंच हर्ष मोदी, खोडशिवणी येथील सरपंच गंगाधर परशुरामकर, माजी जी. प. सदस्य रमेश चुऱ्हे, रजनी गिऱ्हेपंजे, डॉ. अविनाश काशीवार, प. स. सदस्य रुकीराम वाढई, प. स. सदस्य वर्षा शाहारे, प्रभुदयाल लोहिया, राहुल यावलकर, ग्रामसेवक जगदीश नागलवाडे, रंजू भोई ओबीसी संघर्ष कृती समिती च्या महिला तालुका अध्यक्ष, सह ग्राम पंचायत सदस्य व गावकरी उपस्थित होते.
1) सौंदड येथील बुद्ध विहार येथे लायब्ररीमध्ये साहित्य व फर्निचर पुरवठा करण्यासाठी 10 लक्ष रुपयाचा निधी मंजूर, 2) लोहिया शाळेच्या बाजूने जाणाऱ्या मार्गावर सिमेंट रस्ता तय्यार करण्यासाठी करण्यासाठी 10 लक्ष रुपयाचा निधि मंजूर, 3) विस्वकर्मा मंदिर जवळ सभा मंडप बांधकाम करण्यासाठी 5 लक्ष रुपयाची निधि मंजूर, तसेच 4) कुणबी समाज येथे समाज भवनाचे बांधकाम करीता 20 लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आले. एकूणच सौंदड येथे पहिल्यांदाच 45 लक्ष रुपयाचा निधी प्राप्त झाला असून आमदार मोहद्यांच्या हस्ते कुदळ मारून भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी आमदार मनोहर चंद्रिकापुरे, सरपंच व राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर परशुरामकर, राष्ट्रवादी पक्षाच्या महीला तालुका अध्यक्ष रजनी गिऱ्हे पुंजे यांचे शाल व श्रीफळ देऊन समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आले.
आमदार मोहद्यानी बोलताना सांगितले की सौंदड गावात पुन्हा निधी उपलब्ध करून देणार असून प्रत्येक समाजातील नागरीकांना त्याचा फायदा होणार आहे. या पूर्वी सौंदड येथील लोकप्रतिनिधी बरोबर आपले योग्य संपर्क नव्हते त्या मुळे आपल्या मार्फत गावात विकास कामे झाली नाही. मात्र आता हर्ष मोदी यांच्या कार्यकाळात आम्ही गावात विकास कामांची कमतरता भासू देणार नाही. आणि निधीचीही कमतरता भासू देणार नाही. अशी ग्वाही दिली आहे. आम्ही या आदी देखील निधी देण्यासाठी तय्यार होतो. मात्र कुणी कामे करायला तय्यार नसल्याने कामे झाली नाही. ही सत्यता आहे.
त्याच बरोबर सरपंच हर्ष मोदी यांनी देखील गावातील विकास कामासाठी आपण निधी खेचून आणणारा असल्याची ग्वाही दिली आहे. त्याचे नियोजन देखील केले असल्याची माहिती हर्ष मोदी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
