लोहिया विद्यालयात महापरिनिर्वाण दिना निमित्त बाबासाहेब यांना अभिवादन!


सौंदड, दी. 09 डिसेंबर : लोहिया शिक्षण संस्था द्वारा संचालित रामेश्र्वरदास जमनादास लोहिया माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय, रामदेवबाबा अध्यापक विद्यालय व जमुनादेवी लोहिया प्राथमिक शाळा, सौंदड यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 6 डिसेंबर रोज बुधवारला विद्यालयात संस्थापक- संस्थाध्यक्ष जगदीश लोहिया यांच्या प्रेरणेने आनंदराव घाटबांधे उपाध्यक्ष लो. शिक्षण संस्था यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिन निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आनंदराव घाटबांधे यांनी प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण केले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून, प्राचार्य मधुसूदन अग्रवाल प्राचार्य, गुलाबचंद चिखलोंडे, मुख्याध्यापक मनोज शिंदे पर्यवेक्षक डी. एस. टेंभुर्ण, प्राध्यापक आर. एन. अग्रवाल, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी प्राध्यापक एस. पी. करंबे सर, यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित समाजातील लोकांच्या शिक्षणासाठी दिलेल्या योगदानाबद्दल विद्यार्थांना सविस्तर मार्गदर्शन केले.

विद्यार्थांनी सुद्धा आपल्या भाषणातून व गीताद्वारे त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला. कार्यक्रमाला विद्यालयातील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापिका बोरकर यांनी केले तर आभार स. शिक्षिका के. एस. काळे यांनी मानले.


 

Leave a Comment

और पढ़ें